Milwaukee Monster Jeffrey Dahmer Story: जगातल्या सगळ्यात खतरनाक सीरीअल किलरांचा विषय निघाला की, सगळ्यात आधी कदाचित जेफरी डामर याचं नाव घेतलं जातं. कारण त्याच्या कृत्यांवर अनेक मालिका आणि सिनेमे बनले आहेत. अमेरिकेच्या मिलवौकी शहरात राहणारा जेफरी डामर किती खतरनाक होता, याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, लोक आजही त्याच्यासाठी 'कसाई' आणि 'राक्षस'सारखे शब्द वापरतात. या नरभक्षीने एकूण 16 लोकांची जीव घेतला होता. त्याची दहशत अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये होती.
हा गुन्हेगार हत्या केल्यानंतर पीडितांचं मांस खात होता. यामुळेच लोक त्याला मिलवौकीचा 'राक्षस' म्हणत होते. यूएस मीडिया रिपोर्टनुसार, डामर एखाद्याची हत्या करण्याआधी त्याला ड्रग्स देत होता. पोलिसांनुसार, डामरने पहिली हत्या 1978 मध्ये 19 वर्षीय स्टीव हिक्सची केली होती. त्याने त्याला लिफ्ट दिली आणि नंतर घरी घेऊन गेला. त्याला दारू पाजली आणि जेव्हा तो घरी परत जात होता तेव्हा त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तो घराच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. त्याचे अनेक तुकडे करून घराच्या अंगणात दफन केले.
डामरने दुसरी हत्या 1980 मध्ये केली. यानंतर 1990 पर्यंत तो नव्या लोकेशनवर म्हणजे आपल्या आजीच्या घरी लोकांना मारत होता. त्याने 16 हत्या केल्या. 1991 मध्ये 17वी शिकार शोधली. ट्रेसी एडवर्ड्सला त्याने आपल्या घरी बोलवलं. खाऊ-पिऊ घातलं. पण तो सतर्क होता. तो बेशुद्ध झाला नाही आणि कसातरी डामरच्या जाळ्यातून पळून पोलिसांकडे गेला. पोलिसांना त्याने सगळं काही सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराला अटक केली.
डामरचा फ्रिज जेव्हा पोलिसांनी चेक केला तर त्यात जे दिसलं ते पाहून टीममध्ये असलेली एक महिला पोलीस बेशुद्ध झाली होती. कारण डामरने हत्या केल्यानंतर काहींच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या मृतदेहांचे अनेक तुकडे आणि शीर आढळून आले.कोर्टात हजर केल्यावर जेव्हा त्याचं मेडिकल चेकअप केलं तर तो मानसिक आजारी असल्याचं समोर आलं. त्यानंतर 1992 मध्ये त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 15 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण 1994 मध्ये तुरूंगात क्रिस्टोफर स्कार्वर नावाच्या एका कैद्याने डामरची हत्या केली.