झारखंडच्या पाकुरमध्ये 16 एप्रिल रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका 15 वर्षीय विधी संघर्ष बालकाने बाल सुधार गृहात गळफास लावून आत्महत्या केली. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपीने दुमका येथील हिजला रोड येथील बाल सुधारगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. दुमका येथे आल्यानंतर त्याला कोरोनामुळे अलग ठेवण्यात आले. त्याने चादरीने गळफास लावून घेतला. पोस्टमॉर्टमनंतर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांच्या पथकाने मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला. बाल सुधार गृह प्रभारी बाबर यांच्या फिर्यादीनंतर मुफस्सिल पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीसह सामूहिक बलात्काराच्या घटनेत 15 वर्षाच्या विधी संघर्ष बालकास पकुर येथील दुमका बाल सुधार गृहात पाठविण्यात आले होते. पीडित मुलीबरोबर सामूहिक बलात्काराचे अनेक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.या विधी संघर्ष बालकास १७ एप्रिलच्या दिवशी दुमका येथे पाठवल्यानंतर इतर बाल कैद्यांपेक्षा वेगळ्या खोलीत एकट्याने अलग ठेवण्यात आले. रात्री दोन गार्डची ड्युटी होती. संध्याकाळी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. गुरुवारी सकाळी गार्डने खोलीचा दरवाजा उघडला असता विधी संघर्ष बालक चादरीला लटकलेला अवस्थेत होता. गळफास लावून घेण्यापूर्वी तो बादलीवर उभा राहिला आणि गळ्यात फास टाकल्यानंतर बादली पायाने बाजूला केली.
सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या विधिसंघर्ष बालकाने गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 9:16 PM
Suicide Case : सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपीने दुमका येथील हिजला रोड येथील बाल सुधारगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.
ठळक मुद्दे दुमका येथे आल्यानंतर त्याला कोरोनामुळे अलग ठेवण्यात आले. त्याने चादरीने गळफास लावून घेतला.