केरळच्या पतनमतिट्टाच्या एका स्थानिक न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत आजवरची सर्वाधिक शिक्षा सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १४२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपीने दहा वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे बलात्कार केला होता.
जिल्हा पोलिसांनी याची माहिती दिली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयकुमार जॉन यांनी आनंदन पी आर या ४१ वर्षीय आरोपीला १४२ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर त्याच्यावर ५ लाखांचा दंडही सुनावला आहे. जिल्ह्यातील ही पॉक्सो प्रकरणातील सर्वाधिक शिक्षा आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
असे असले तरी आरोपीला एकूण 60 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तो 10 वर्षीय पीडितेचा नातेवाईक आहे. बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले. आरोपीने २०१९-२०२१ मध्ये मुलीचे लैंगिक शोषण केले. आरोपी हा पीडित मुलीच्या घरी राहत असताना त्याने हा अत्याचार केला.
केरळमधील एका जलदगती न्यायालयाने अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अल्पवयीनांवरील लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत अनेक गुन्ह्यांसाठी एकूण 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 2018 मध्ये, इडुक्की जिल्ह्यात 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी आणि घटनेची साक्षीदार असलेल्या तिच्या लहान बहिणीच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. धक्कादायक बाब म्हणजे तिची आई आपल्य़ा जबाबावरून फिरली होती.