मुंबई - वडाळा परिसरात रहात असलेल्या आठ आणि नऊ वर्षाच्या बालिकेवर एका नराधमाने फूस लावून अपहरण केले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी चांद शेख (२०) याला वडाळा टी. टी. पोलिसांनीअटक केली.
अँटॉप हिल भारत कमलानगर परिसरात शेख रहातो.याच परिसरात राहत असलेल्या दोन चिमुरड्यांना त्याने चॉकलेट देण्याच्या आमिषाने बोलाविले. नंतर खोलीत नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केले. घरी गेल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलींना दुखापत झाल्याने रडू लागल्या. आईने विचारणा केल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नंतर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून चांद शेखला अटक करण्यात आली. न्यायालयाने शेखला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.