नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 'पबजी' आणि 'फ्री फायर' (PubG and Free Fire Online Game) या ऑनलाईन गेममुळे एका अल्पवयीन मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या 12 वर्षीय चुलत भावाची गळा दाबून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीतही पुरला. इतकच नाही तर आसाममध्ये असलेल्या चुलत भावाच्या काकांकडून मुलाने फेक इन्स्टाग्राम आयडीवरुन मेसेज करून 5 लाख रुपयांची खंडणीही मगितली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गावाजवळी तलावाच्या किनाऱ्यावर जमिनीत पुरलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढला आहे. सध्या तो मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाा आहे. 8 डिसेंबर रोजी धुंडीला गावातील प्रवीण आपल्या आईचा मोबाईल घेऊन घरातून गायब झाला होता. प्रवीणचे काका यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यांनी सांगितलं की, प्रवीणला पबजी आणि फ्री फायर खेळण्याची सवय होती. यानंतर पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला.
ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला
आसाममध्ये असलेल्या प्रवीणच्या दुसऱ्या काकाला इन्स्टाग्रामवरुन मेसेज आला की, प्रवीण त्या व्यक्तीकडे आहे. तो दिल्लीत आहे. तो जिवंत हवा असेल तर 5 लाख रुपये द्या. यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत कळवल. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास केल्यानंतर तो इन्स्टाग्राम आयडी धुंडीला गावातील असल्याचं दिसून आलं. या मोबाईलमध्ये दुसऱ्या मोबाईलच्या हॉटस्पॉटवरुन इंटरनेट चालवलं जात होतं. याचा तपास केल्यानंतर प्रवीणच्या अल्पवयीन चुलत भावावर संशय़ आहे. त्याची चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला.
अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचं पाऊल अन्...
पोलिसांनी चौकशी केली असता अल्पवयीन मुलाने मोबाईलमध्ये पबजी, फ्री फायर आणि तीन पत्तीसारखे गेम खेळतो. यात सातत्याने हरत असल्याने त्याच्यावर कर्ज झालं होतं. इतरही व्यसन होतं. त्यामुळे पैशांची गरज होती. मृत प्रवीणदेखील त्याच्यासोबत गेम खेळत होता. यामुळे त्याने तलावाशेजारी त्याची गळा दाबून हत्या केली. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यानंतर मोबाईलमधलं सिम काढून फेकून दिलं. इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार केला. दुसऱ्या मोबाईल नेटवर्कवरुन हॉटस्पॉट घेऊ आसाममध्ये राहणाऱ्या प्रवीणच्या काकांना खंडणीचे पैसे मागितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.