धुळे : शिरपुर तालुक्यातील मुखेड येथे अवघ्या सात वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार करणा-या एकास धुळयाच्या बाल न्याय मंडळाचे अध्यक्षा तथा न्यायाधिश गंगवाल शाह तसेच सदस्य यशवंत हरणे व ॲड अनिता भांबेरे यांनी दोषी धरले आहे. या विधी संघर्ष बालकास दोन वर्षांसाठी मुंबई येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेत पुनर्वसनासाठी पाठवण्याचे देखिल आदेशात नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात वैदयकीय अधिका-यांचा पुरावा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांस तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाची ठरली आहे.
शिरपुर तालुक्यातील मुखेड येथे रहाणा-या सात वर्षे वयाच्या या पिडीतेचे नातेवाईक 21 जानेवारी 2016 रोजी घरी नसल्याची संधी पाहुन 17 वर्षे वय असलेल्या या विधी संघर्ष बालकाने अत्याचार केला होता. याच दरम्यान पिडीतेचे दोन नातेवाईक घटनास्थळावर आले असता त्यांना अत्याचार करणारा मुलगा पळुन जात असतांना दिसुन आला. तर पिडीता गंभिर जखमी अवस्थेत आढळुन आली. त्यामुळे पिडीतेच्या नातेवाईकांनी शिरपुर पोलिस ठाणे गाठुन या घटनेची तक्रार दाखल केल्याने भादंवी कमल 376 ( 1) ( i) सह बालकांवर लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करुन विधी संषर्घ बालकाला ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा तपास तत्कालिन पोलिस निरीक्षक मंगलसिंग सुर्यवंशी व पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी करुन चौकशी अहवाल धुळयाच्या बाल न्याय मंडळासमोर सादर केला. या कामी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा प्रिंसीपल मॅजीस्ट्रेट गंगवाल शाह तसेच सदस्य यशवंत हरणे व ॲड अनिता भांबेरे यांच्या समोर या तपासणी अहवालावर कामकाज चालवण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने तत्कालीन सरकारी वकील पी बी वाघ , आर पी चौधरी तसेच विशाल पाटील यांनी सरकार पक्षाच्यावतीने मंडळाच्या समोर 11 साक्षीदार सादर केले. या कामी पिडीतेचे नातेवाईक असणारे साक्षिदार तसेच तपास अधिकारी यांनी या घटनेची सविस्तर माहीती दिली. या खटल्याच्या चौकशीत पिडीतेची वैदयकीय तपासणी करणारे वैदयकीय महाविदयालयातील डॉ वैशाली पाटील तसेच शिरपुरचे डॉ भरत गोहील तर विधी सघर्ष बालकाची तपासणी करणारे वैदयकीय अधिकारी डॉ. कैलाससिंग राजपुत यांची महत्वाची साक्ष झाली. यात पिडीतेची वैदयकीय तपासणी केलेला दाखला तसेच विधी संघर्ष बालकाचा वैदयकीय तपासणी अहवाल मंडळापुढे वैदयकीय अधिकारी यांनी सविस्तरपणे साक्ष देतांना मांडला. तसेच तपास अधिकारी सुर्यवंशी व पवार यांनी घटना व पुरावे मंडळासमोर मांडल्याने या चौकशीत बालकाने गुन्हा केल्याचे सिध्द झाले आहे.
त्यानुसार मंडळाच्या अध्यक्षा गंगवाल शाह यांनी याप्रकरणाचा निकाल देण्यासाठी यापुर्वी झालेल्या अनेक न्यायनिवाडयांचे अवलोकन केले. यानंतर बालकास भादंवी कलम 376 ( 1) ( i) अन्वये दोषी धरण्यात आले आहे. त्यानुसार या बालकाची रवानगी दोन वर्षांसाठी मुंबई येथील डेविड ससुन प्रशिक्षण केंद्रात करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कालावधीत या प्रशिक्षण केंद्रात या बालकाला पुनर्वसन कामी व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात येणार असुन याचा अहवाल नियमितपणे धुळयाच्या बाल न्याय मंडळाला सादर करण्याचे देखिल आदेशात नमुद करण्यात आले आहे.