अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात दिल्लीपोलिसांनी रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) दोन कॉन्स्टेबल असलेल्या प्रदीप आणि प्रेमचंद यांना अटक केली आहे. लॉकडाऊन दरम्यान या दोन्ही कॉन्स्टेबल यांना एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचा आरोप आहे.एका १६ वर्षांच्या मुलीने आपल्या जबाबत पोलिसांना सांगितले आहे की, ती झारखंडची रहिवासी आहे आणि दिल्लीच्या प्रीत विहारमध्ये ९ वर्षांपासून घरकाम करत होती. बर्याच दिवसांपासून तिला घरी जायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद होती, म्हणून तिला तिच्या गावी जाता आले नाही.१२ जून रोजी मुलगी घरमालकाला न सांगता घरातून आपलं सामान घेऊन आनंद विहार रेल्वे स्टेशनला जाण्यास निघाली. पण तिथे पोहोचल्यावर मुलीला समजले की, आनंद विहार येथून ट्रेन सुरु नाही झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी नंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली, जिथे तिला रेल्वेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी कॉन्स्टेबल तिथे पोहोचला आणि मुलीला रांचीला जाण्यासाठी ट्रेन पकडून देतो अशी बतावणी केली. नंतर, आरोपी कॉन्स्टेबलने दुसर्या कॉन्स्टेबलला बोलावले. दोन्ही कॉन्स्टेबल मुलीला एका खोलीत घेऊन गेले. तेथे मुलीला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचा पदार्थ दिला. त्यानंतर एका कॉन्स्टेबलने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱा कॉन्स्टेबलने गेटजवळ उभं राहून पहारा देत दुष्कर्मात सामील झाला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर भादंवि कलम ३७६ डी अंतर्गत सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविला आणि दोन्ही कॉन्स्टेबल यांना अटक केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल