मुंबई- मानसिकदृष्ट्या अक्षम मुलगी काल सायंकाळ पासून जोगेश्वरी हद्दीतून हरवल्या होती. सोशल मीडिया, मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी संजय पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या ताई सुखरूप चार तासातच सुखरूप घरी परतल्या.
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळे आणि सोशल मीडियाचा प्रभावी व सकारत्मक उपयोग करून आजवर आपण हरवलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी यशस्वी शोधमोहीम राबवून २४१ नागरिकांना शोधण्यासाठी यशस्वी झालो. जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते, पोलिस मित्र शिवाजी खैरनार यांनी लोकमतला ही माहिती दिली.एखादी व्यक्ती हरवल्याची महिती मिळताच खैरनार हे फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा तसेच गणपती मंडळ,ब्लड डोनेशन ग्रुप आणि त्यांच्या इतर वॉटस अप ग्रुपवर पोस्ट टाकतात.त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीचा शोध लवकर घेण्यात यश येते अशी माहिती त्यांनी दिली.
मेघवाडी पोलीस स्टेशन निर्भया पथकाचे पी एस आय अश्विनी मोरे, चालक दादासाहेब दमदाडे आणि स्थानिक नागरिक मयेकर यांनी सदर मुलीला पोलीस स्टेशनला आणलें होते. महिला कॉन्स्टेबल ज्योती चाटे व आदेश पाटील यांनी हरवलेली मुलगी घरी सुखरूप परतल्याची माहिती दिली.
यावेळी या आपली मुलगी सुखरूप सापडल्याबद्धल तिच्या कुटुंबीयांनी मेघवाडी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाचे तसेच सर्व पोलीस अधिकारी व शिवाजी खैरनार यांचे खास आभार मानले.