ठळक मुद्देपटेल यांनी २ कोटी रुपयांचे कर्ज बीएचआरमधून घेतले होते. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
जळगाव : बीएचआर प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांना सोमवारी पुणे विशेष न्यायालयाने २० टक्के रक्कम दहा दिवसात व २० टक्के रक्कम पुढील तीन महिन्यात भरण्याचे आदेश तसेच अटीशर्ती व एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. ॲड.अनिकेत निकम यांनी पटेल यांच्यावतीने बाजू मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ दिले.
पटेल यांनी २ कोटी रुपयांचे कर्ज बीएचआरमधून घेतले होते. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. इतर कर्जदारांप्रमाणेच त्यांनीही कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. सरकाकडून वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.