कल्याण - सामान्यांकरीता रेल्वे सुरु करा यासाठी मनसेने काल सविनय कायदेभंगची आंदोलनाची हाक दिली होती. पोलिसांनी आंदोलन करु नका असे सांगून मनसे कार्यकत्र्याना नोटिस बजावल्या होत्या. अखेर या नोटिसचे उल्लंघन करीत मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी अन्य तीन कार्यकत्र्यासह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला.
या प्रकरणी कजर्तहून देशपांडेसह अन्य तीन कार्यकत्यऱना रेल्वे पोलिसांनी अटक केली. आज कल्याणच्या रेल्वे न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने प्रथम न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर देशपांडे यांच्या वकिलांनाने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामीनावर देशपांडे यांची सुटका केली आहे. यावेळी न्यायालयाच्या आवारात मनसे कार्यकत्र्यानी एकच गर्दी केली होती. वाहतूक कोंडीचा फटका देशपांडे यांच्या वकिलांना बसला. त्यामुळे त्याना न्यायालयात येण्यास उशिर झाला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक
फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त