शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मनसे आमदार राजू पाटील हे ईडी कार्यालयात गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 3:28 PM

MNS MLA Raju Patil visit to ED Office : एका प्रकरणातील साक्षीदार म्हणून ईडी कार्यालयात गेल्याची आमदार राजू पाटील यांची माहिती

ठळक मुद्दे 2015 साली मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांना अटक केली होती.

कल्याण - मनसेचे आमदार राजू पाटील हे आज ईडीच्या कार्यालयात गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पण त्यांच्याच एका प्रकरणात ते ईडी कार्यालयात साक्षीदार म्हणून गेलो होतो अशी माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

2015 साली मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांना अटक केली होती. विपीन पाटील याने मनसेते नेते आणि विद्यमान आमदार पाटील यांच्याकडे खंडणीची सुपारी कुख्यात डॉन रवी पूजारी याला दिली असल्याच्या आरोप आहे. प्रकरणात ईडीने मनसे आमदार पाटील यांना 23 जून रोजी समन्स बजावले होते. पाटील यांनी 23 जून रोजी त्यांची साक्ष दिली होती. मात्र ते काही निमित्त पुन्हा बाहेर जाणार असल्याने ईडी कार्यालयात माझी काही गरज आहे का हे विचारण्यासाठी स्वत:हून गेले होते. मात्र त्यांची आज काही देखील विचारपूस झाली नाही. ही माहिती स्वत: पाटील यांनी दिली आहे.

राजू पाटील यांच्याकडे खंडणीची सुपारी देणारा विपीन पाटील हा डोंबिवलीचा आहे. विपीन आणि दयानंद जाटान  या दोघांवर गंभीर आरोप आहे की, ठाणे जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीकडे जास्त पैसा आहे. कोणत्या बिल्डरेच काम कुठे सुरु आहे. कोणता नेत्याला धमकी दिल्याने फायदा होईल ही सर्व माहिती कुख्यात डॉन रवी पूजारीला हे दोघे देत होते. ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणते गुन्हेगार आपल्यासाठी कामाला येऊ शकतात. याची चिठ्ठा ही ते पुरवित होते. या प्रकरणात दोघांना 2015 साली अटक झाली होती. सध्या रवी पूजारीला अटक करुन भारतात आणले गेले आहे. रवी पूजारीशी संबंधित सगळ्य़ा गुन्हयांचा तपास सुरु आहे. या तपासा दरम्यानच राजू पाटील यांच्याकडे खंडणीची सुपारीचे प्रकरणी ते स्वत: साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांची साक्ष झाली आहे. ईडी कार्यालयात जाण्यामागे कुठलेही आर्थिक प्रकरण नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRaju Patilराजू पाटीलMNSमनसेkalyanकल्याण