अलवर: जयपूर-मुंबई हायवेवर मोबाईल चोरीची मोठी घटना घडली आहे. धावत्या ट्रकमधून तीन दरोडेखोरांनी 1 कोटी किमतीचे 227 स्मार्टफोन चोरले. पण, अलवर जिल्ह्यातील मलाखेडा पोलिसांनाना या टोळीतील तीन जणांचा मुसक्या आवळण्यात यश आले. तसेच, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले 227 अँड्रॉइड मोबाईल फोन, तीन देशी बनावटीची पिस्तूल आणि एक डझन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
नवीन 5G फोन्सची चोरीमिळालेल्या माहितीनुसार, या टोळीकडून जप्त केलेले सर्व मोबाईल 5G चे असून, या फोनची अद्याप मार्केटमध्ये विक्री सुरुही झालेली नाही. हे आरोपी अतिशय हुशार असून, त्यांनी धावत्या कंटेनरमधून हे मोबाईल चोरल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पोलीस पकडलेल्या तिघांची चौकशी करत आहेत.
एक कोटींचे मोबाईलपोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, जयपूर-मुंबई महामार्गावर धावत्या कंटेनरमधून हे मोबाईल लुटले. या मोबाईलची बाजारातील किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. साजिद उर्फ काला(रा.दुडोली हरियाणा), अनिश आणि जब्बार(रा.जयपूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत, तर मोहम्मद, आसिफ आणि अब्बास हे तिघे फरार झाले आहेत. सध्या पोलीस या तिघांची चौकशी करत आहेत. या चोरट्यांकडून इतर अनेक मोठ्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
असे पकडले चोरटेएसपी गौतम यांनी सांगितल्यानुसार, मालाखेडा पोलीस ठाण्याला या टोळीतील लोक मंगळवारी रात्री आल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावर पोलिसांनी रात्री उशिरा हळदीना चौकात वाहनांची तपासणी सुरू केली. यादरम्यान पोलिसांना अलवरच्या बाजूने एक कार येताना दिसली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने गाडी पुढे करून परत नेण्यास सुरुवात केली. त्यावर पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्या गाडीतून तिघांसह मुद्देमाल जप्त केला.