शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘बरेली के बाजार से’ मुंबईत येऊन मोबाइल चोरणाऱ्या तरुणीला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 4:40 AM

उत्तर प्रदेशातील बरेली येथून येऊन मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्थिरावत नाही, तोच लोकल प्रवासात हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणा-या जैनाम कमरु द्दीन शेख ऊर्फजैनाम खान या २३ वर्षीय तरुणीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

- पंकज रोडेकरठाणे : उत्तर प्रदेशातील बरेली येथून येऊन मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्थिरावत नाही, तोच लोकल प्रवासात हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणा-या जैनाम कमरु द्दीन शेख ऊर्फजैनाम खान या २३ वर्षीय तरुणीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सध्या ती जेलची हवा खात आहे. एखाद्या सराईत चोरट्यांसारखी ती सहजतेने पर्स उडवत असे. तिच्यावर ठाणे, मुंबई किंवा नवी मुंबई परिसरात एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकलमधील गर्दीत हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणाºयांवर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी पाळत ठेवून जुलैै महिन्यात ३३ गुन्हे उघडकीस आणले. त्यावेळी २५ चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यामध्ये दोन महिला चोरट्यांचा समावेश असून त्यामध्ये एक सराईत आहे, तर दुसरीवर एकही गुन्हा दाखल नसल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबईत एकही गुन्हा दाखल नसलेली जैनाम नुकतीच उत्तर प्रदेशातील बरेली येथून मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर, ती १० दिवसांपासून मुंब्य्रात वास्तव्याला आली होती.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या पथकाने लोकल प्रवासात २८ जुलै रोजी तिला चोरी करताना रंगेहाथ पकडले. चौकशीत तिने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये दोन मोबाइल आणि तीन पाकीटचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. न्यायालयाने तिची रवानगी जेलमध्ये केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिच्यावर उत्तरप्रदेशात गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती पोलीस यंत्रणा घेणार आहे.वाढत्या मोबाइलचोरीच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, तेथे सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये दोन महिलांना रंगेहाथ चोरी करताना पकडले असून त्यामधील जैनाम ही एक आहे. तपासात तिच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे तसेच नुकतीच उत्तर प्रदेशातून आली असल्याचे ती सांगते.’’- राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस, ठाणे

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक