पिंपरी : मंडई परिसरात चिखली पोलिसांना दोनजण संशयितरित्या आढळून आले असताना त्यांना हटकले. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यातल्या एकाकडे मोबाईल निदर्शनास आला. पोलिसांनी पासवर्ड टाकून मोबाईल स्क्रीन उघडण्यास सांगितले. मात्र, चोरीचा मोबाईल असल्याने त्यांना पासवर्ड माहित नव्हता. ते मोबाईल स्क्रिन उघडू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, चोरीचा मोबाईल असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, चिखली पोलिसांनी नाकाबंदी केली असता, दोनजण शनिवारी रात्री चिखलीतील मंडईजवळ दुचाकीवरून संशयितरित्या वावरत होते. गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक संदीप बांदल यांच्या पथकाने त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच त्यांनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्यापैकी एकाकडे मोबाईल मिळाला. तो चोरीचा असल्याची कबुली त्यांनी दिली. विशाल बाबुराव पांचाळ, विशाल राजू धोत्रे (इंदिरानगर, चिंचवड) अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री केएसबी चौकातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी विनोद रामनवल चौहान (वय २७, रा. कुदळवाडी) यांच्या हातातील अंदाजे सात हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावला होता. या प्रकरणी त्यांनी शुक्रवारी चिखली पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती.शुक्रवारी रात्री मोबाईल हिसकावण्यात आला. शनिवारी रात्री चिखली पोलिसांनी चौहान यांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरटयांना जेरबंद केले. चिखली पोलिसांनी काही तासातच चोरट्यांचा शोध घेतला. ज्यांचा मोबाईल चोरीस गेला होता. त्यांना तो मोबाईल मिळवुन दिला. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
पासवर्ड टाकता न आल्याने मोबाईल चोरटे जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 2:29 PM
चोरीचा मोबाईल असल्याने त्यांना पासवर्ड टाकता आला नाही आणि इथेच सारा घोळ झाला..
ठळक मुद्देगस्तीवरील चिखली पोलिसांची कारवाईपोलिसांनी काही तासातच चोरट्यांचा घेतला शोध