तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Crime News) चेन्नई पोलिसांनी एका २६ वर्षीय तरूणाला एक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी मोहम्मद सईद किलपॉकचा राहणारा आहे आणि व्यवसायाने एक मॉडल आहे. एका महिलेने मोहम्मद विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. महिला म्हणाली की, मोहम्मदने लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली.
किलपॉकचे उपायुक्त कार्तिकेयन यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. मोहम्मद सईद इन्स्टाग्रावर वर्कआउटचे व्हिडीओ अपलोड करत होता. ज्याचा वापर तो कथितपणे महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी करत होता. यानंतर महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. मग त्यांना लग्नाचं आमिष देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता.
तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती मोहम्मदसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिला काही दिवसांपासून मोहम्मदवर संशय येत होता. मग एक दिवस जेव्हा तो नशेत होता तेव्हा तिने त्याचा फोन चेक केला. तेव्हा मोहम्मदचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाहून महिलेला धक्का बसला.
आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीचा खुलासा झाल्यावर महिला डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा समजलं की, मोहम्मद या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक महिलांना ब्लॅकमेल करत होता. सोबतच व्हिडीओ-फोटो लीक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पैसे मागत होता.
सध्या पोलिसांनी मोहम्मद सैयद विरोधात लैंगिक शोषण, फसवणूक, खंडणी वसुली असे काही गुन्हे दाखल केले आहेत. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.