मुंबई : साकीनाका येथे एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ४५ वर्षीय मोहन चौहान याला सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा ठोठावली. मध्यरात्री एका टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कार करून, तिच्या गुप्तांगात लोखंडाची सळई घुसवून तिची हत्या केली होती.
सप्टेंबर २०२१ मध्ये घटनेने महाराष्ट्र हादरला होता. दिंडोशी न्यायालयाचे न्या. एस. सी. शेंडे यांनी मोहन चौहानला ३० मे रोजी भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत दोषी ठरविले. शिक्षा ठोठावताना कोर्टाने म्हटले की, गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ आहे. महिलेवर निर्घृणपणे हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद स्वीकारत कोर्टाने म्हटले की, आरोपीने जीवघेणा हल्ला करून तिच्या जगण्याची शक्यताच त्याने शिल्लक ठेवली नाही. सळईने वार केल्याने आतडे खराब झाले , होते की, तिची पचनसंस्था नष्ट झाली. ‘हा गुन्हा एका महिलेविरोधातील आहे. विशेषत: एका अनुसूचित जातीच्या महिलेवरील अत्याचार असल्याने तो अधिक गंभीर आहे,’ असा युक्तिवाद सरकारी वकील महेश मुळे यांनी केला.
दयेची विनंती फेटाळली
चौहान याच्या वकील कल्पना वासकर यांनी त्यला दया दाखविण्याची विनंती केली. ‘चौहानचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्याच्यावरच अवलंबून आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. फाशी ठोठावली तर पत्नीला त्रास सहन करावा लागेल’, असे वासकर यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने चौहान याला फाशीची शिक्षा ठोठावली.
वाॅचमनचा जबाब
महत्त्वाचा न्यायालयाला सीसीटीव्ही फुटेजही दाखविण्यात आले. या घटनेत एका इमारतीचा वॉचमन हा महत्त्वाचा साक्षीदार होता. त्यानेच महिलेला जखमी अवस्थेत पाहून पोलिसांना कॉल केला होता.
कधी घडले ?
१० सप्टेंबर २०२१- महिलेवर लैंगिक अत्याचार११ सप्टेंबर २०२१- राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असताना महिलेचा मृत्यू आणि आरोपी मोहनला अटक२८ सप्टेंबर २०२१- मुंबई पोलिसांनी ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल३० मे २०२२- सत्र न्यायालयाने चौहान याला हत्या, बलात्कार व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दोषी ठरविले२ जून २०२२- फाशीची शिक्षा ठोठावली.