पिंपरी : खून, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी-मारामारी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी असे विविध स्वरुपातील गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगाराच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीतील सहा आरोपींविरोधात ही कारवाई झाली. यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज सिराज कुरेशी (वय २२, रा. कासारवाडी) असे मोका लावण्यात आलेल्या टोळीच्या प्रमुखाचे नाव आहे. अक्षय ऊर्फ लिंगा संजय भोसले (वय २५, रा. जुनी सांगवी), योगेश ऊर्फ लंगडा विठ्ठल टोम्पे (वय २०, रा. पिंपळे गुरव), अरबाज मुन्ना शेख (वय २०, रा. खडकी) यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण सहा आरोपींचा या टोळीत समावेश असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शाहबाज सिराज कुरेशी, याच्यावर खून, गंभीर दुखापत, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी-मारामारी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या टोळीतील साथीदार अक्षय ऊर्फ लिंगा संजय भोसले याच्यावर खून, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरी चोरी यासारखे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. योगेश ऊर्फ लंगडा विठ्ठल टोम्पे याच्यावर खून, वाहनचोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अरबाज मुन्ना शेख याच्यावर खून, गर्दी, मारामारी यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन अल्पवयीन आरोपींवरही जबरी चोरी, चोरी यासारखे दोन गुन्हे दाखल आहेत.आरोपींविरोधात दाखल गुन्ह्यांचे अवलोकन होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्फ त मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठिविला होता. त्यानुसार पोकळे यांनी आदेश पारीत केलेले आहेत. सदर प्रस्ताव त्रुटीविरहित तसेच परिपूर्णरित्या सादर करण्याची कामगिरी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिात पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, शंकर बाबर, पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांनी कामगिरी केली..........वर्चस्वासाठी प्रयत्न : आर्थिक फायद्यासाठी कृत्यआरोपी शाहबाज कुरेशी याच्यासह त्याच्या टोळीतील आरोपींनी पिंपरी येथे रोहित किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांच्या हॉटेलमधून बिअर खरेदी करून हॉटेल समोर लघुशंका केली. त्या वेळी हॉटेलमधील कामगारांनी त्यांना हटकले असता त्यांना मारहाण केली. त्या वेळी हितेश गोवर्धन मुलचंदानी हा तरुण भांडण सोडविण्यासाठी आला.आरोपींनी त्याला एका वाहनात जबरदस्तीने बसवून मारहाण करून धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हितेश याचा मृतदेह महापालिकेच्या मागे रस्त्यावर टाकून दिला. वर्चस्वासाठी व त्यातून मिळणाºया आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळी बनवून शाहबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पिंपरी येथील हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मोका’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 2:40 PM
दोन अल्पवयीन मुलांसह सहा आरोपींचा समावेश
ठळक मुद्देवर्चस्वासाठी प्रयत्न : आर्थिक फायद्यासाठी कृत्य