पिंपरी : चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या महिलेचा विनभंग दुचाकीस्वार पुतण्याने केला. पिंपरीत ही घटना घडली. ४९ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पती आणि मुलीसह पिंपरी येथील त्यांच्या घरातून चारचाकी वाहनातून बाहेर जात होते. या वेळी त्यांचा पुतण्या दुचाकीवरून येऊन फिर्यादी महिलेला चारचाकीला ओव्हरटेक करून जात होता. यावेळी दुचाकीस्वार पुतण्या उजव्या हाताचे मधले बोट वर करून व हलवून घाणेरडे इशारे करत होता. पुढे जाऊन थांबल्यानंतर त्याने पुन्हा घाणेरडे इशारे आणि शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या पतीने विचारणा करण्यासाठी चारचाकी त्यांच्या पुतण्याजवळ थांबविली. त्यानंतर आरोपी पुतण्याने फिर्यादी महिला, पती आणि मुलगीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच महिलेचा हात पकडून त्यांना त्याच्या छातीजवळ ओढू लागल्याने त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरीत ४९ वर्षीय महिलेचा पुतण्याकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 2:48 PM
आरोपी पुतण्याने फिर्यादी महिला, पती आणि मुलगीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली...
ठळक मुद्देपिंपरी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा दाखल