शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी डॉक्टर गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 9:14 PM

Doctor Arrested : मानकापूरच्या कोविड हॉस्पिटलमधील घटना 

ठळक मुद्देनंदू रहांगडाले (वय ३९) असे आरोपी डॉक्टरचे नाव असून तो अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिल टॉप परिसरात राहतो. 

नागपूर  : कोविड हॉस्पिटलमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या एका महिला डॉक्टरवर तेथील सीनियर डॉक्टरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. नंदू रहांगडाले (वय ३९) असे आरोपी डॉक्टरचे नाव असून तो अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिल टॉप परिसरात राहतो. 

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या खाजगी इस्पितळात तो नोकरीला आहे. १० दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिला डॉक्टर नोकरीला लागली. ती सोमवारी रात्री इस्पितळात कर्तव्यावर असताना आरोपी डॉ. नंदूने तिला चेंजिंग रूम मधे बोलावले. तेथे तिच्याशी त्याने लगट सुरू केली. या अनपेक्षित प्रकारामुळे डॉक्टर हादरली. आरोपी डॉक्टरचा तीव्र प्रतिकार करून ती चेंजिंग रूम मधून बाहेर पडली. त्यानंतर ती रुग्णालयातून सरळ घरी गेली. तत्पूर्वी, आरोपी डॉक्टराने हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची आणि नोकरी वरून काढण्याची तिला धमकी दिली. दरम्यान,  ती घरी पोहोचले. तेव्हा अत्यंत घाबरलेली दिसल्यामुळे घरच्यांनी तिला विचारपूस केली असता तिने आपल्या पालकांना झालेली घटना सांगितली. पालकांनी तिला मानकापूर पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिला डॉक्टरने पोलिसांसमोर आपबिती कथन केली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे आणि पोलिस उपनिरीक्षक संतोष श्रीरामवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालय गाठले. प्राथमिक चौकशीनंतर आरोपी डॉक्टरला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. महिला डॉक्टरची तक्रार नोंदवून त्याच्याविरुद्ध विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.डॉक्टरला पोलीस कोठडीडॉक्टर नंदूला पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टरnagpurनागपूर