रामपूरः एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांचे हातपाय बांधून ते नराधम मुलीवर अडीच तास सामूहिक बलात्कार करत होते. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता शहजाद नगर पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली. त्याउलट पोलिसांनीच पीडितेच्या कुटुंबीयांवर जबाब बदलणं आणि तक्रार न देण्याचा आरोप केला आहे.उत्तर प्रदेशातील रामपूरमधील शहजादनगर ठाणे क्षेत्रातील एका गावात हे कुटुंब विटाच्या भट्ट्या लावण्याचं काम करतं. भट्टीच्या जवळच त्यांची झोपडीसुद्धा आहे. सोमवारी रात्री तीन तरुण झोपडीत घुसले आणि वडिलांना चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर रात्री 9 वाजल्यापासून 11.30 वाजेपर्यंत सामूहिक बलात्कार करत राहिले. अल्पवयीन मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाले. त्यानंतर इतरांनी बांधलेल्या वडिलांचे हात-पाय मोकळे केले. पीडित कुटुंबीयांनी लागलीच पोलीस स्टेशन गाठून या प्रकाराची माहिती दिली. परंतु पोलिसांनी गुन्हाच नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. शहजाद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कार्यवाही आणि मेडिकलसाठी मुलीला 8 ते 10 दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवावं लागेल, असं सांगितल्याचं पीडितेचे काका म्हणाले. एएसपी अरुण कुमार सिंह यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची चौकशी केली. भट्टीच्या मालकानंही पोलिसांच्या भानगडीत पडू नये, असा पीडितेच्या कुटुंबीयांना सल्ला दिला आहे. दुसरीकडे शहजादनगर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महिला बलात्कार प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंदवण्याचे आदेश आहेत. या प्रकारानंतर वडील आणि मुलगी वारंवार जबाब बदलत आहेत. तसेच मुलगी मेडिकलसाठीसुद्धा तयार नाही. कोणत्याही पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांसोबत अशा पद्धतीचं वर्तन केलेलं नसल्याचं म्हणाले आहेत.
वडिलांचे हात-पाय बांधून अल्पवयीन मुलीवर अडीच तास सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 9:23 AM
एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देएका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला वडिलांचे हातपाय बांधून ते नराधम मुलीवर अडीच तास सामूहिक बलात्कार करत होते. पोलिसांनीच पीडितेच्या कुटुंबीयांवर जबाब बदलणं आणि तक्रार न देण्याचा आरोप केला आहे.