शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 7:58 PM

ओशिवरा पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीत कैद आरोपीचा शोध सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

ठळक मुद्दे १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस अंधेरी लोखंडवाला मार्केटमधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हा घृणास्पद प्रकार घडला.या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला

मुंबई - १७ वर्षीय तरुणीला प्रोफाइल घेण्यासाठी बोलावून आपण प्रसिद्ध कंपनीत जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी केली आणि  प्रोफाइल देण्यासाठी आलेल्या तरुणीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावर नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात घडला आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीत कैद आरोपीचा शोध सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

अंधेरी लोखंडवाला मार्केटमधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हा घृणास्पद प्रकार घडला. १७ वर्षाची तरुणी अंधेरीत कुटुंबासह राहते. वडिलांचा मीरारोड येथे टूर्स आणि ट्रॅव्हलर्स व्यवसाय असून तरुणी १२ वी कॉमर्समध्ये शिकत आहे. तिचा संपर्क ३० वर्षीय अज्ञात तरुणाशी आला होता. त्याने आपण प्रसिद्ध जाहिरात कंपनीत जाहिरात प्रतिनिधी असल्याची खोटी बतावणी केली. एका प्रसिद्ध शितपेयाच्या जाहिरातीत काम करतो असे सांगून भामट्या तरुणाने तिची सर्व माहिती मिळवली. मात्र, तरुणीला तिची शारीरिक उंची माहिती नव्हती म्हणून तिला उंची काढण्यासाठी त्याच्या कार्यालयात इमारतीच्या पाचव्या माळ्यावर आणले. कार्यालय बंद होते. त्यावेळी भामट्या तरुणाने त्याच ठिकाणी तिची उंची घेण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाMolestationविनयभंगAdvertisingजाहिरात