चंद्रपूर : मूल येथील कृषी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याशी कार्यालयातीलच कृषी सहाय्यकाकडून असभ्य वर्तणूक केल्याची घटना उजेडात आली असून, याप्रकरणी संबंधित कृषी सहाय्यकाविरुद्ध पोलिसांनीविनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
मूल येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलविले होते. यावेळी कृषी अधिकारी कामात व्यस्त असल्याने सदर महिला कर्मचारी कार्यालयात बसल्या होत्या. तेव्हा त्याच कार्यालयातील कृषी सहाय्यक प्रल्हाद मानेराव यांनी सदर महिलेशी असभ्य वर्तन केले.
पीडित महिला कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कृषी सहाय्यक मानेराव यांच्याविरूध्द भादंवि ३५४ (ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कृषी सहाय्यक मानेराव फरार असून पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके करीत आहेत.