इंग्लंडमध्ये आपल्या मुलाची हत्या कुणी केली हे माहित असूनही त्याची आई पोलिसांशी खोटं बोलत राहिली. आई मारेकऱ्याला पाठिशी घालत असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला वाचवण्यासाठी ती सतत खोटं बोलत असल्याचंही उघड झालं आहे. आई आपल्या पोटच्या मुलाच्या मारेकऱ्याची माहिती असूनही खोटं का बोलत होती, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मात्र तपासात त्याचंही उत्तर पोलिसांनी सापडलं आहे.
पोलिसांनी सांगितले की, लुसीचा प्रियकर केन मिशेल (३१) याने नोव्हेंबर 2019 मध्ये तिच्या अडीच महिन्यांच्या मुलाची हत्या केली. त्याने मुलाचे डोके भिंतीवर आपटले आणि निष्पापाचा मृत्यू झाला. ब्रिटनमधील केंब्रिजशायर भागात राहणाऱ्या 29 वर्षांच्या लुसी या महिलेला डेटी नावाचा अडीच वर्षांचा मुलगा होता. लुसीचे 31 वर्षांच्या मिशेलसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. अनेकदा लुसी घरात नसताना मिशेल तिच्या घरात राहत असे. लुसीचा मुलगा टेडीवर त्याचा राग होता आणि आपल्या प्रेमसंबंधात तो अडथळा ठरत असल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो अडीच वर्षांच्या बाळाचा छळ करत होता.
लुसी घरात नसताना एक दिवस मिशेलने टेडीला उचलून त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. लुसी घरी आल्यावर जखमी झालेला टेडी तिला दिसला. ती बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतली नाही. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे टेडीचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
टीव्हीवर दिलेल्या प्रतिक्रियेतही आपलं आपल्या मुलावर खूप प्रेम होतं आणि त्याचा जीव कसा गेला, हे आपल्याला माहितही नसल्याचं तिने सांगितलं. मात्र मिशेलला अटक करून तपास केला असता त्याने भिंतीवर आपटल्यामुळे बाळाच्या मेंदूत फ्रॅक्चर झालं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.