सध्या सायबर भामट्यांचा सुळसुळाट झालाय, त्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही सतत वाढ होत आहे. सायबर क्राइमची तक्रार ऑनलाइन करता येते. यामुळे बँकिंग फसवणूक आणि सायबर बुलिंगमुळे होणारे नुकसान टाळता येईल. जाणून घ्या, सायबर क्राइमची ऑनलाइन तक्रार कशी नोंदवायची...
सोपी आहे प्रक्रिया
सायबर क्राइमची ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी आधी ब्राउझर ओपन करा. त्यानंतर www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर जा. येथे ‘फाइल अ कम्प्लेन’ हा पर्याय निवडा.
यानंतर एक विंडो उघडेल, ज्यामध्ये राज्य, मोबाइल नंबर टाकून लॉग इन करा. मोबाइलवर मिळालेला ओटीपी टाका. माहिती दिल्यानंतर सबमिट करा.
त्यानंतर घटना तपशील कॉलमवर जा. तुमची समस्या प्रविष्ट करा आणि विचारलेली माहिती प्रदान करा. सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
यानंतर, ज्याबाबत शंका आहे, एखाद्याचा व्यक्तीचा तुम्हाला संशय आहे किंवा धोका वाटत असेल त्याबाबत माहिती द्या. नंतर तक्रार तपशील पर्यायामध्ये तुमचा ई-मेल आयडी आणि फोटो सबमिट केल्यानंतर तक्रारीची पडताळणी केली जाईल.
व्हेरिफिकेशन झाल्यावर कन्फर्म बटणावर क्लिक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर वापरकर्ता तक्रारीची प्रत पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतो. यानंतर तक्रारीला ट्रॅक करता येईल.