शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

महिलेवर महिनाभर सामूहिक बलात्कार, भाजपा आमदारासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 9:55 PM

दुसरीकडे आरोपी आमदाराने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले आणि ते म्हणाले की, जर हे आरोप खरे असतील तर तो कुटूंबाला फाशी देण्यास तयार आहे.

ठळक मुद्देपीडित महिला वाराणसीची असून तिने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात महिलेने आमदारासह सात जणांवर आरोप केले आहेत. एका महिलेने १० फेब्रुवारीला भाजपाचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी संदीप, सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश आणि नितेश एका हॉटेलमध्ये महिनाभर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप केला.

भदोही - उत्तर प्रदेशातील भदोही येथील भाजपाचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला वाराणसीची असून तिने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात महिलेने आमदारासह सात जणांवर आरोप केले आहेत. दुसरीकडे आरोपी आमदाराने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले आणि ते म्हणाले की, जर हे आरोप खरे असतील तर तो कुटूंबाला फाशी देण्यास तयार आहे.या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक राम बदन सिंह म्हणाले की, एका महिलेने १० फेब्रुवारीला भाजपाचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी संदीप, सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश आणि नितेश एका हॉटेलमध्ये महिनाभर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप केला. एकदा तर ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. भदोही पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ (ड), ३१३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.वैद्यकीय तपासणीनंतर कारवाई, सध्या अटक नाहीया प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्र वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिलेचे वक्तव्य आणि हॉटेलसह सर्व मुद्द्यांचा तपास केल्यानंतर भाजपच्या आमदारासह सात आरोपींविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पीडित महिलेचा जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सिंह म्हणाले. आता कोणालाही अटक होणार नाही.

 

पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहेया महिलेचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप असा केला आहे की, २०१७ च्या उत्तर प्रदेशातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान तिला भदोही शहरातील एका हॉटेलमध्ये दीड महिना ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्याच्यावर सतत बलात्कार केला गेला. इतकेच नाही तर त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांनीही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेचा नवरा मरण पावला आहे.'आरोप खरे ठरले तर कुटुंब फाशी देण्यास तयार'त्याचवेळी भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले आहे. आरोपी आमदाराने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मी या प्रकरणात कोणत्याही तपास यंत्रणेला तोंड देण्यास तयार आहे. पोलीस तपासातील आरोप खरे ठरले तर मी कुटुंबास फाशी देण्यास तयार आहे. महिलांचे संरक्षण ही माझी पहिली जबाबदारी आहे. सर्व स्त्रिया आमच्या माता आणि बहीणीसारख्याच आहेत. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसBJPभाजपा