कानपूर : सोसायटीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवताना एका घराला आग लागून त्यात आई आणि तिच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात घडली आहे. आपले छोटेसे घर वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघींना त्याच घरात लागलेल्या आगीत आपली आहुती द्यावी लागली. याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात होरपळण्यापूर्वी काही क्षण आधी सदर महिला अधिकाऱ्यांनीच आग लावल्याचे सांगताना दिसते.
अधिकारी पळाले, ३९ जणांवर गुन्हासंतप्त लोकांनी आग लावल्याचा आरोप करत गोंधळ सुरू केला. एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जखमी करण्यात आले. जमावाचा संताप पाहून इतर अधिकाऱ्यांनी पळ काढत जीव वाचवला. आतापर्यंत ३९ अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते म्हणाले, आगीतून कोणीही वाचता कामा नये...nप्रमिलाचे पती कृष्ण दीक्षित म्हणाले, “एसडीएम आणि तहसीलदार बुलडोझर घेऊन आले होते. गावातील अनेक लोक त्यांच्यासोबत होते. या लोकांनी अधिकाऱ्यांना आग लावण्यास सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आग लावली. nमी मुलासह कसेतरी झोपडीतून बाहेर पडलो, पण आई आणि मुलगी आतच राहिल्याने जळून मरण पावले. अधिकारी आम्हाला जळते सोडून पळून गेले. कोणीही कसलीही मदत केली नाही. मुलगा शिवम म्हणाला, “एसडीएम, एसओ, लेखपाल या सगळ्यांनी मिळून माझ्या घराला आग लावली. कोणीही आगीतून वाचता कामा नये, असे एसडीएम सांगत होते.
सोमवारी चहला गावात पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक गावातील सोसायटीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचले होते. यावेळी झोपडी पाडण्यात आली आणि तिला आग लावण्यात आली, आई-मुलीला जिवंत जाळण्यात आले, असा आरोप होत आहे.
आगीत प्रमिला दीक्षित (४१) आणि मुलगी नेहा (२१) यांचा मृत्यू झाला. दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा पती कृष्ण गोपाल, घरमालक भाजले.