शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 7:35 PM

Crime News : तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले.

तामिळनाडूतील इरोड येथील एका प्रायव्हेट फर्टिलिटी क्लिनिकमध्ये 16 वर्षीय मुलीला एकदा नव्हे तर आठ वेळा अंडी दान करण्यास भाग पाडण्यात आले. मुलीला असे करण्यास भाग पाडणाऱ्या 3 जणांना पोलिसांनीअटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक पीडितेची आई आहे. याप्रकरणी आता आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले.

एफआयआरनुसार, पीडितेची आई तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली आहे. त्यानंतर तिने दुसऱ्याशी लग्न केले. त्यांच्यासोबत एक अल्पवयीनही मुलगी राहत होता. दोघेही पीडितेला मारहाण करायचे. तिला जबरदस्तीने बीजांडी दान करण्यास भाग पाडले. सावत्र वडील, अन्य एका महिलेसह, एका प्रायव्हेट फर्टिलिटी क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीला बीजांडी दान करण्यास सांगायचे.दुसऱ्या आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्ड बनवून पाच हजारांचे कमिशन घेतले होते. त्याचवेळी आरोपी आईने मुलीची बीजांडी 20 हजार रुपयांना विकली होती. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्याच्या अनेक कलमांखाली, IPC कलम 420 (फसवणूक) आणि 506 (ii) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी अल्पवयीन मुलीची 33 वर्षीय आई, तिचा 40 वर्षीय सावत्र पिता आणि आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिघेही सालेम मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. आई आणि सावत्र वडिलांच्या छळाला कंटाळलेल्या या अल्पवयीन मुलीने मे महिन्यात सालेम येथील नातेवाइकांच्या घरी पळून जाऊन आपला त्रास सांगितला,तेव्हा ही बाब उघडकीस आली.दरम्यान, मुलीची आई आणि इतर दोघे सालेम येथे आले, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी मुलीला धमकावून पुन्हा इरोडला नेले. मुलीच्या नातेवाइकांनी आरोपी आई आणि इतर दोघांविरुद्ध इरोड दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली.वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालनालयाच्या सहा सदस्यीय पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता, गेल्या पाच वर्षांत मुलीला तिची बीजांडी विविध प्रजनन केंद्रांना विकण्यास भाग पाडण्यात आले. वैद्यकीय व ग्रामीण आरोग्य सेवा सहसंचालक ए. विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ६ जून रोजी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला.

सोमवारी अधिकाऱ्यांनी इरोडमधील दोन खासगी रुग्णालये आणि सेलममधील दोन खासगी रुग्णालयांची तपासणी केली. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रजनन केंद्रांमध्येही तपासणी सुरू आहे. रुग्णालयांचीही यात काही भूमिका आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणातील डॉक्टरांचाही सहभाग तपासण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडूArrestअटक