नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. याच दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल झाले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. दोन घास मिळत नसल्याने कसं जगायचं हाच प्रश्न काहींसमोर उभा राहीला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरिबीला कंटाळून जन्मदात्या आईनेच आपल्या चिमुकलीचा जीव घेतला आहे.
आर्थिक संकटाचा सामना करताना मुलांसाठी दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही करू शकत नसल्याने आईनेच सहा वर्षाच्या लेकीची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील भेसकी गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उषा देवी असं या महिलेचं नाव आहे. महिलेला दोन मुलं असून मुलीच्या भविष्याची चिंता तिला सतावत होती. त्यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं मानसिक संतुलन ठीक नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही ती करू शकत नव्हती. उषाचे पती रत्नेश तिवारी मजुरीचं काम करत होते. मात्र एक अपघात झाला. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. काम करणं शक्य नसल्याने पतीच्या अपघातानंतर महिलेवर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यामुळेच गरिबीला कंटाळून तिने मुलीचा जीव घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलगी कोणतीच हालचाल करत नसल्याचं पाहून या आरोपीने गुगलवर मुलीचा मृत्यू झाला आहे की ती जिवंत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्चही केलं. तसेच या धक्कादायक घटनेनंतर दोन तासांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंतर्गत गंभीर जखमा झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.