ब्रिटनमध्ये ३४ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला त्याच्या आईच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी गंभीर मानसिक समस्येने ग्रासलेला असल्याने त्याला आता अनिश्चित काळासाठी रुग्णालयात ठेवण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला होता, त्यामुळे आईचा मृत्यू झाला होता.एजन्सीच्या म्हणण्यानुसार, शनील पटेलला लंडनमधील गेल्या महिन्यात कोर्टात दोन दिवसांच्या तथ्य-शोध चाचणीनंतर ओल्ड बेली कोर्टाने शिक्षा सुनावली होती. शनीलने ६२ वर्षीय आई हंसा पटेल यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला होता. यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
तपासाचे नेतृत्व करणाऱ्या मेट्रोपॉलिटन पोलिस स्पेशालिस्ट क्राइम कमांडच्या डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर मारिया ग्रीन यांनी सांगितले की, या प्रकरणात न्यायाबद्दल बोलणे कठीण आणि दुःखदायक आहे. हंसा पतीसोबत राहत होती. दोघांचेही त्यांचा मुलगा शनीलवर खूप प्रेम होते. ती नुकतीच सेवानिवृत्त झाली होती जेणेकरून ती तिच्या पतीसह आपल्या मुलाची मानसिक आजारावर उपचार करू शकेल.आरोपीला क्रॉनिक पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रासले आहेशनील पटेल २००९ पासून क्रॉनिक पॅरानोइड स्किझोफ्रेनियाने त्रस्त आहेत. २५ नोव्हेंबर २०२० रोजी पटेलने त्याच्या आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी त्याला वेस्टवे क्रॉस शॉपिंग सेंटरजवळ बसमधून अटक केली. अटकेच्या वेळी पटेलने घातलेले कपडे जप्त करण्यात आले, फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आणि त्याच्या आईच्या रक्ताचे अंश सापडले. घटनास्थळावर रक्ताने माखलेल्या बुटाच्या खुणाही आढळून आल्या. हल्ल्यात वापरलेली रक्ताने माखलेली क्रिकेट बॅट जप्त करण्यात आली आहे.