फेसबुकवर सध्या रील बनवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. या रीलमुळे अनेकजण प्रसिद्धही झाले आहेत. या रीलमुळे एक विवाहित महिला प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील आहे. ही महिला आधीच दोन मुलांची आई आहे. ही घटना रंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरली गावात घडली, तिथे दोन मुलांची आई फेसबुकवर प्रेमात पडल्यानंतर तिच्या प्रियकरासह पळून गेली.
कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार, तरुणाला अटक
मिळालेली माहिती अशी, आधार कार्ड बनवण्याच्या बहाण्याने विवाहितेने घर सोडले आणि प्रियकरासह पळून गेली. मुरली गावात राहणाऱ्या ब्रजेश कुमार सिंह या तरुणाशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती.पत्नीच्या विरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ८ वर्षांपूर्वी त्याचा सुषमा देवीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोन मुलेही झाली. पतीचा आरोप आहे की, पत्नी सुषमा देवी फेसबुकच्या माध्यमातून रील बनवायची. यादरम्यान तिचे पाटणा येथील एका मुलाशी फेसबुकवर प्रेम झाले आणि ती ५ सप्टेंबर रोजी प्रियकरासह पळून गेली.
ब्रजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, 5 सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नीने दोन्ही मुलांना सकाळी जेवण दिले आणि शाळेत पाठवले आणि मीही कामावर गेलो. पत्नी सुषमा देवी शेजाऱ्याला आधार कार्ड बनवणार असल्याचे सांगून बाहेर आल्या.
पती ब्रजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नीने दोन्ही मुलांना सकाळी जेवण दिले आणि शाळेत पाठवले आणि मीही कामावर गेलो. पत्नी सुषमा देवी शेजाऱ्याला आधार कार्ड बनवणार असल्याचे सांगून बाहेर पडली.
यानंतर ती शाळेत पोहोचली आणि दोन्ही मुलांना सोबत घेऊन प्रियकरासह पळून गेली. आरोपानुसार, महिलेने तिच्यासोबत ७ हजार रुपये रोख, दागिने आणि प्रमाणपत्रही नेले. पीडितेच्या पतीने सांगितले की, त्याची पत्नी पाटणाच्या तरुण प्रभा कुमारशी फेसबुकवर बोलायची, त्याने अनेकदा पत्नीला प्रियकराशी बोलताना पकडले होते. वादानंतर पत्नीने प्रियकराशी न बोलण्याची शपथ घेतली होती मात्र तरीही ती बोलत राहिली आणि ५ सप्टेंबर रोजी प्रियकरासह पळून गेली.