हुंड्यामुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. बिहारच्या पूर्णिया येथे राहणाऱ्या नूरी खातून हिचा विवाह सुलिंदाबाद येथील मोहम्मद परवेज याच्याशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्याला दोन मुलीही आहेत. आरोपानुसार, मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून मुलीच्या कुटुंबीयांकडे एक लाख रुपये आणि बाईकची मागणी सातत्याने केली जात होती. हुंडा न दिल्याने तिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
मृताच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, घरी फोन करून करंट लागल्याने मृत्यू झाल्याची कुटुंबीयांना माहिती दिली. जेव्हा लोक पाहण्यासाठी गेले तेव्हा मृतदेह पूर्णपणे कापडाने गुंडाळलेला होता. कोणाला काहीच कळू नये म्हणून असं करण्यात आलं. परंतु मुलीला आंघोळ घालताना महिलांनी नूरी परवीनच्या मानेवर जखमेच्या खुणा पाहिल्या. त्यावरून तिला गळा आवळून मारण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते.
मुलीच्या आईने समाजातील लोकांवर खोटा पंचनामा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर मुलीची आई हुंड्याची मागणी हे मृत्यूचे कारण असल्याचं सांगत आहे. यामध्ये एक लाख रुपये आणि बाईकची मागणी करण्यात असल्याचे आरोपात म्हटलं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मात्र, ही बाब उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली. डीएसपी एजाज मानी हाफिज यांनी दंडाधिकारी यांना मुलीला कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदन करून पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुढील कारवाई सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"