उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बकरी विकण्यावरून झालेल्या भांडणानंतर मुलाने स्वतःच्या आईला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बचरा गावात झाली. बकरे विकण्यावरून झालेल्या भांडणात एका ५० वर्षीय महिलेची तिच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत कमलेश देवी यांच्या मुलाने शुक्रवारी रात्री त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्याने जीवंत जाळले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिचा मुलगा किशून बिहारी यादव याने तिला कपड्यांखाली लपवले आणि तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेऊन आग विझवली, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेचा मुलगा किशून यादव याला अटक केली आहे. कमलेश देवी या घरात मुलगा आणि सुनेसह राहत होता आणि बकरी विकण्यावरून तिचा मुलासोबत वाद झाला होता.
हत्येला आत्महत्या म्हणणारे 'प्राचार्य'! डॉक्टरांवर भ्रष्टाचाराचे आरोप
कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. हे प्रकरण तापले असताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी मात्र कोणतेही गांभीर्य न बाळगता संतापजनक विधान केल्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ. घोष हे कोलकाता येथील त्याच आर. जी. कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते, जिथे ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. खरे तर घोष यांची ताकद आणि त्यांचा दबदबा सर्वकाही सांगून जातो. (kolkata murder case full story)
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मृत महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाली होती. गळा दाबला गेला, पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या खुणा होत्या. तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्मा तुटून डोळ्यात घुसला. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. (kolkata murder case doctor) विशेष बाब म्हणजे असे असताना देखील संबंधित ट्रेनी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे रुग्णालयाने मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना सांगितले. आत्महत्येचे कारण खुद्द डॉक्टर घोष यांनी दिल्याचा आरोप आहे. (kolkata murder case girl) या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने डॉ. घोष यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले, पण ते गेले नाहीत. अखेर १६ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. (kolkata murder case full story in marathi)