ठळक मुद्देज्ञानदा संजय लोकरे (वय २) असे मृत बालिकेचे नाव असून याप्रकरणी रेवती संजय लोकरे (वय २६) हिला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली : शहरातील दडगे प्लॉट (संजयनगर) परिसरात दोन वर्षांच्या मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा घोटून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. रविवारी दुपारी तिचा अचानक मृत्यू झाला होता. मुलगी गतीमंद असल्याने तिच्या आईने एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य केले. ज्ञानदा संजय लोकरे (वय २) असे मृत बालिकेचे नाव असून याप्रकरणी रेवती संजय लोकरे (वय २६) हिला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे.