शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

Crime News : दोन मुलांची आई असलेली मामी भाच्याच्या प्रेमात पडली, घर सोडून पळून गेली आणि नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 3:58 PM

Crime News : सोनू आणि बबिता यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर याबाबत पंचायतही बसली. सगळीकडून येत असलेल्या दबावामुळे हे प्रेमी युगुल चार दिवसांपूर्वी घरातून फरार झाले होते.

रांची - झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील नवलशाही ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मामी आणि भाच्याच्या प्रेमाचा अत्यंत भयावह शेवट झाल्याचे समोर आले आहे. (Crime News)मिळत असलेल्या माहितीनुसार १८ वर्षीय सोनू साव आणि २१ वर्षीय बबिता देवी यांच्यात भाचा आणि मामीचे नाते होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेरीस या प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत महिलेला दोन लहान मुले आहेत. (Mami, a mother of two, fell in love with her Nephew, ran away from home and then Both committed suicide)

 या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सोनू आणि बबिता यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर याबाबत पंचायतही बसली. सगळीकडून येत असलेल्या दबावामुळे हे प्रेमी युगुल चार दिवसांपूर्वी घरातून फरार झाले होते. या प्रकरणी महिलेचा पती रमेश साव याने ५ सप्टेंबर रोजी सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार नवलशाही ठाण्यात नोंदवली होती. त्यामध्ये त्याने त्याच्या भाच्यावरच आपल्या पत्नीला पळवून नेल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी धनबादमध्ये या जोडप्याने विषप्राशन केल्याची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर महिलेच्या पतीने धनबाद येथे धाव घेतली मात्र तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टेमनंतर ६ सप्टेंबर रोजी रात्री दोघांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचला. महिलेच्या मृतदेहावर तिच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, या युवकाचा मृतदेह जेव्हा घरी आणण्यात आला तेव्हा या युवकाच्या नातेवाईकांनी आक्रोष केला. तसेच या युवकाची हत्या झाल्याची शंका व्यक्त करत कोडरमा-गिरिडीह मुख्य रस्ता पहाडपूरजवळ बंद केला. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी लोकांना रस्त्यावरून हुसकावून लावले. सोनू साव याची हत्या झाल्याचा आरोप आंदोलनकर्ते लोक करत होते. तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. मृत सोनू साव याचे वडील रामचंद्र साव यांनीही एसपींकडे निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित महिलेचा पती रमेश साव, त्याचा भाऊ पंकज साव, दिनेश साव तसेच महिलेचे मामा यांनी त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करून नंतर विष पाजून त्याची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवारJharkhandझारखंड