शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

मुलीच्या रडण्यामुळे मिळाले आईला जीवदान; गळफास घेतलेल्या महिलेचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:37 PM

यावेळी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी पोलिसांनी ओढणीचा फास कापून महिलेला खाली उतरवले. तर अग्निशमन दलाचे कर्मचारी राकेश सरोदे यांनी त्या महिलेला सीपीआर दिला असता तिच्या शरीराची हालचाल जाणवली.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : - बंद घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याच्या तक्रारीमुळे महिलेला जीवदान मिळाले आहे. तक्रारीवरून पोलीस व अग्निशमन दल तात्काळ त्याठिकाणी गेले असता, महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. परंतु प्रसंग सावधानता दाखवत बचाव दलाने  महिलेला सीपीआर देऊन तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने प्राण वाचले आहेत.

उलवे सेक्टर 5 येथे शुक्रवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याठिकाणच्या इमारतीमधील बंद घरातून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याची तक्रार पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये मिळाली होती. हा संदेश एनआरआय पोलिसठाण्याचे बिट मार्शल किरण स्वार व पांडुरंग कवठे यांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस त्याठिकाणी पोचले असता त्यांनी बंद घराचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये असलेल्या चार वर्षाची मुलीने बंद बेडरूमच्या दिशेने इशारा केला. त्यामुळे बेडरूमचा दरवाजा देखील तोडला असता आतमध्ये सिलिंगच्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेली महिला आढळून आली.

यावेळी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी पोलिसांनी ओढणीचा फास कापून महिलेला खाली उतरवले. तर अग्निशमन दलाचे कर्मचारी राकेश सरोदे यांनी त्या महिलेला सीपीआर दिला असता तिच्या शरीराची हालचाल जाणवली. यावरून त्यांच्यात प्राण शिल्लक असल्याची खात्री होताच तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे सदर महिलेचे प्राण वाचले असल्याचे एनआरआय पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तन्वीर शेख यांनी सांगितले. घटनेवेळी महिला व लहान मुलगी दोघीच घरात होत्या. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिलाPoliceपोलिस