लखनौ : पब्जी हा ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखणाऱ्या आईची १६ वर्षीय मुलाने हत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात घडली. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी सांगितले की, या मुलाला पब्जी खेळण्याची सवय लागली आहे. त्याच्या आईने त्याला हा गेम खेळण्यास नकार दिला. त्यामुळे तो नाराज होता. मुलाने शनिवारी आपल्या आईवर गोळी झाडली. आईचा मृतदेह दोन दिवस खोलीत बंद ठेवला. त्यानंतर मंगळवारी सैन्यात तैनात असलेल्या वडिलांना या घटनेची माहिती दिली.
ही घटना घडली तेव्हा मुलाची ९ वर्षीय बहीण घरीच होती. या मुलाने तिला धमकावले आणि मृतदेहाची दुर्गंधी रोखण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर केला. यमुनापुरम कॉलनीतील या घटनेत या मुलाने आपल्या वडिलांच्या लायसन्स असलेल्या बंदुकीचा उपयोग केला. पोलिसांनी ही बंदूक जप्त केली आहे. मंगळवारी या मुलाने वडिलांना या घटनेची माहिती दिली. वडिलांनी शेजाऱ्यांना सांगितले आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली.