शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

अपहरण करत चालत्या गाडीत लुटले, माहिमच्या रस्त्यावर सव्वा तासाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 3:19 AM

पासपोर्ट बनविण्याचे काम केले नाही म्हणून ४२ वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला चालत्या गाडीत मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी माहिममध्ये उघडकीस आली.

मुंबई : पासपोर्ट बनविण्याचे काम केले नाही म्हणून ४२ वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला चालत्या गाडीत मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी माहिममध्ये उघडकीस आली. सव्वा तास माहिमच्या रस्त्यावर हा लुटीचा थरार रंगला होता. या प्रकरणी माहिम पोलिसांनी बाबर खानसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गोरेगाव मोतीलाल नगर परिसरात रोशन डिसोझा (४२) हे राहण्यास आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून पासपोर्ट बनविण्याचे काम करतात. त्याच दरम्यान त्यांची ओळख बाबर खान याच्यासोबत झाली. बाबरने त्यांच्याकडे ४ मुलांना परदेशात नोकरीसाठी पाठविले. त्यांचे पासपोर्ट डिसोझा यांनीच बनवून दिले होते. मात्र तेथे काम न पटल्यामुळे तरुण मुंबईत परतले. डिसोझा यांनी बाबरसोबत काम करणे सोडले. यावरून बाबर आणि डिसोझा यांच्यात वाद सुरू झाला. बुधवारी दुपारी २ वाजता डिसोझा नेहमीप्रमाणे गोरेगावमध्ये चर्चमध्ये गेले आणि पावणेतीनच्या सुमारास तेथून बाहेर पडले.याच दरम्यान एकाने त्यांना फोन करून परदेशात नोकरीनिमित्ताने जायचे असल्याबाबत सांगितले. तेव्हा, डिसोझा यांनी नकार दिला. मात्र संबंधित व्यक्तीने त्यांना भेटण्यास बोलावले. पार्क केलेल्या एम.एच. ०३ - ०८४८ या गाडीकडे येण्यास सांगितले. ते गाडीकडे जाताच, पाठीमागून एकाने त्यांना गाडीत ढकलले. दरवाजा बंद करून गाडी माहिम जंक्शन येथून जुहूच्या दिशेने निघाली. पुढे काही अंतरावर बाबरही गाडीत चढला.गाडीत चौघांनी मिळून त्यांना मारहाण सुरू केली. ते मदतीसाठी ओरडत असताना त्यांचे तोंड दाबण्यात आले. तब्बल सव्वा तास गाडी माहिमच्या रस्त्यांवर फिरत होती. डिसोझा यांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. तसेच पैशांसह डेबिट कार्डही स्वत:कडे घेतले. धमकावून डेबिट कार्डचा पिन क्रमांकही मिळवला.त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास त्यांना पुन्हा चर्च परिसरातच सोडून चौकडीने पळ काढला. त्यांनी मित्राला घडलेला प्रकार सांगताच, त्याने घटनास्थळी धाव घेत डिसोझा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखलकेली. घटना माहिम परिसरात घडल्याने गुन्हा दाखल करून तपास माहिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या घटनेचा माहिम पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी