पोलिसांनी कंडोमच्या मदतीने सॉल्व्ह केली रेप आणि मर्डर मिस्ट्री, आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:26 PM2021-08-04T18:26:03+5:302021-08-04T18:29:32+5:30
कुणालाही या घटनेची खबर नव्हती आणि आरोपी मोठ्या आरामात फिरत होते. पण त्यांच्या एका चुकीने ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Gang Rape) भिंडमध्ये पोलिसांनी कंडोमच्या (Condom) मदतीने रेप आणि मर्डरची एक केस सॉल्व्ह केली आहे. या केसमध्ये दूरदूरपर्यंत कोणताही पुरावा मिळत नव्हता. भिंडमध्ये आरोपींना एका महिलेसोबत रेप केला आणि हत्या करून तिचा मृतदेह एका पोत्यात बांधून खड्ड्यात (Rape and Murder Case) फेकून दिला. कुणालाही या घटनेची खबर नव्हती आणि आरोपी मोठ्या आरामात फिरत होते. पण त्यांच्या एका चुकीने ते पोलिसांच्या तावडीत सापडले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिसरातील कैमोखरी गावात १७ जून रोजी एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला दिसून आला होता. पोत्याचं तोंड बांधलेलं होतं. तरी त्यातून दुर्गंधी येत होती. यातून हे स्पष्ट होत होतं की, मृत्यू काही दिवसांपूर्वी झालाय. गावातील लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. (हे पण वाचा : Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल)
पोलिसांनी चौकशीच्या सुरूवातीलाच संशय व्यक्त केला की कुणीतरी महिलेची हत्या करून पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात टाकला आणि खड्ड्यात फेकला. जेणेकरून कुणाला समजू नये. यात केसमध्ये पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण मृत महिलेची ओळखही पटली नाही. महिलेचं वय ४० च्या आसपास सांगितलं जात आहे.
घटनास्थळी सापडला कंडोम
घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना तिथे एक कंडोम सापडला. जो गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठा पुरावा ठरला. पोलिसांनी आधी कंडोमच्या बॅच नंबरबाबत माहिती काढली. सोबतच महिलेची ओळख पटवण्यासाठी काही पॅम्पलेटही छापण्यात आले होते. यात महिलेच्या चेहऱ्याबाबत, कपड्यांबाबत आणि स्थितीबाबत माहिती देण्यात आली होती. (हे पण वाचा : माणुसकीला काळीमा! 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह)
असा सापडला पुरावा
ही मर्डर केस सॉल्व्ह करण्यादरम्यान कंडोमच्या बॅचवरून पोलिसांना माहिती मिळाली की, असे कंडोम मिहोनाच्या सरकारी हॉस्पिटलकडून कुटुंब नियोजनासाठी वाटले जातात. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. इथेच त्यांच्या हाती मोठा पुरावा लागला. तसेच महिलेची ओळख पटवण्यासही यश आलं. मृत महिलेच्या परिवाराने सांगितलं की, महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. सोबतच त्यांना श्याम नावाच्या एका तरूणावर हत्येचा संशय आहे. पोलिसांनी श्यामला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा त्याने पूर्ण घटनाक्रमच उलगडला.
तीन आरोपींना अटक
पोलिसांनी याप्रकरणी श्यामसोबतच अकिंत आणि विक्की नावाच्या आरोपींनाही अटक केली. हत्येत वापरण्यात आलेली बाइकही ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींनी महिलेचा मोबाइल फोन OLX वर विकला होता. आता पोलीस या गॅगरेप आणि मर्डर केसमध्ये सहभागी इतर आरोपींचा शोध आहे.