मध्य प्रदेशमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ बनवण्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरवर आहे. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात भोपाळ पोलिसच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता त्याचा शोध घेण्यासाठी छापेमारी केली जात आहे.
भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पोलीस कॉन्स्टेबल विरोधात कथितपणे एक महिला पोलीस अधिकाऱ्याचा आंघोळ करताना व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा आरोपाखाली केस दाखल केली आहे. आरोपी कॉन्स्टेबलचं नाव भूपेंद्र सिंह आहे. तो महिला पोलीस अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून तैनात होता. (हे पण वाचा : माय लेकराचा दुर्दैवी अंत; जळगाव महामार्गावर गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झाला अपघात)
कुठे होता मोबाइल
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत आरोप लावला आहे की, त्यांना असं जाणवलं की, कुणीतरी तिचा व्हिडीओ काढत होतं. ही घटना २२ सप्टेंबरची होती. अधिकाऱ्याला आपल्या बाथरूमच्या दरवाज्याखाली एक मोबाइल कॅमेरा पाहिला आणि बाहेर येताच त्यांचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला.
महिला अधिकाऱ्याने आरोप लावला की, २६ सप्टेंबरला ड्रायव्हर तिच्या घरी आला आणि त्याने पाच लाख रूपयांची मागी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाला संपर्क केला.
आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विरोधात ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती वसूलीसोबत इतरही गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी सध्या फरार आहे. असं सांगितलं जात आहे की, त्याने क्राइम ब्रॅंचसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला.