MP Business Tycoon Wife: बड्या बिझनेसमनला लग्नांचा छंद! पॉर्न स्टारसोबतही थाटला संसार; पत्नीच्या आरोपांनी हादरले MP सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:25 PM2022-11-07T15:25:19+5:302022-11-07T15:26:09+5:30
पती रॉल्स रॉयस, फेरारी अशा महागड्या कार्स घेऊन पळून गेल्याचाही पत्नीचा दावा
MP Business Tycoon Wife Allegation : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील रुग्णालयात एका बड्या उद्योगपतीची पत्नी जीवन-मरणाशी झुंज देत आहे. महिलेच्या पतीने केलेल्या मारहाणीमुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महिलेने व्हिडिओ जारी करून पतीविरोधात तक्रार केली आहे. पीडित महिलेने सांगितले की, तिचा नवरा मोठा व्यापारी (businessman) आहे. त्याने इतर महिलांशी लग्नही केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीनेही एका पॉर्न स्टारशीही संसार थाटला आहे. पतीचा व्यवसाय परदेशातही पसरलेला आहे. त्याच कारणामुळे तो सतत फिरतीवर असतो. त्याला लग्न करण्याचा छंद आहे आणि त्यामुळे तो अनेक महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
नक्की काय अन् कसं घडलं?
व्यावसायिकाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. व्यावसायिकाच्या पत्नीवर सध्या भोपाळ येथील नर्मदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. पतीने एका पॉर्न स्टारसोबत गुपचूप लग्न केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पत्नीने त्यांचा फोटोदेखील मीडियाला शेअर केला आहे. त्या पॉर्न स्टारने चिथवल्यामुळेच पती आपल्यावर अत्याचार आणि मारहाण करत असल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे. महिलेने आरोप केला आहे की पती आपली मुले, महागडी रोल्स रॉयस, फेरारी या कार्स आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन मुंबईला पळून गेला आहे.
'आमचे लग्न २०११ मध्ये झाले. लग्नानंतर मला कळले की तो आधीच विवाहित आहे. तेव्हापासून तो माझा छळ करत होता. त्याला लग्न करण्याचा छंद आहे. त्याने अनेक महिलांशी विवाह केले आहेत,' असा आरोप महिलेने केला आहे.
पोलिसांनी घेतली दखल, महिलेचा जबाब नोंदवणार
पीडित महिलेच्या भावनिक व्हिडिओ समोर आल्यानंतर भोपाळ पोलीस सक्रिय झाले आहेत. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर पोलीस तिचा जबाब नोंदवणार आहेत. आरोपी व्यावसायिक बँकिंग, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, खाणकाम, औषधनिर्माणाचा व्यवसाय करतो. त्याचे मुख्य कार्यालय मुंबईतच आहे. या व्यावसायिकाला भूतकाळात अनेकदा पुरस्कारही मिळाले आहेत. आरोपीची कंपनी सुखोई-३० आणि एमआयजी (MIG) विमानांसाठीच्या किरकोळ पार्ट्सची विक्री करते. यासोबतच आरोपीची नॅशनल बँकिंग कंपनीही आहे. अनेक महागड्या चित्रपटांमध्ये त्याने गुंतवणूक केली आहे. आरोपीच्या कंपनीच्या लंडन, नेदरलँड, इंटेल, स्पेन, रशिया, जर्मनी, हाँगकाँग, अमेरिका, चीन आणि दुबई येथे शाखा आहेत.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, हा पती-पत्नींचा विषय आहे, त्यामुळे आम्ही जास्त खोलात जाऊन चौकशी अद्याप तरी केलेली नाही. न्यायाचा विषय जेथे येतो, तेथे मात्र राज्यातील शिवराजसिंह चौहान यांचे सरकार जनतेला न्याय देण्यात तत्पर आहे.