मध्य प्रदेश (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) आरती मिश्रा हत्याकांडाबाबत (Aarti Singh Murder) एक खळबळजनक खुलासा झाला आहे. यात २ महिला आणि एका तांत्रिकासहीत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीतून समोर आलं की, १८ वर्षापासून अपत्य होत नसलेल्या कपलने आरतीची हत्या केली होती. पौर्णिमेच्या रात्री बळी देण्यासाठी आरतीची हत्या करण्यात आली. याप्रकरणात मुरैनाच्या एका तांत्रिकाचा रोलही समोर आला. ज्याने मुल होण्यासाठी महिलेचा बळी देण्याचा उपाय सांगितला होता. त्याने दावा केला होता की, पौर्णिमेच्या रात्री एका महिलेचा बळी दिला तर दाम्पत्याच्या घरी मुलाचा जन्म होईल.
कॉलगर्लचा दिला बळी
पोलिसांनी हत्याकाडांत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपी दाम्पत्य ममता भदौरिया, तिचा पती बेटू भदौरिया, बेटूची बहीण मीरा राजावत आणि बॉयफ्रेन्ड नीरज परमारला अटक केली आहे. मृत महिला एक कॉलगर्ल होती. तिला १० हजार रूपये देऊन बोलवण्यात आलं होतं.
चौकशीत आरोपींनी सांगितलं की, मर्डर-२ सिनेमा बघून त्यांनी हत्येचा प्लान केला आणि त्यांनी कॉलगर्लला बोलवून बळी देण्याचा विचार केला. त्यांनी विचार केला की, कॉलगर्लचा बळी देऊ, कुणी चौकशीही करणार नाही आणि पोलिसही काही दिवस चौकशी करून विसरून जातील. पण कॉलगर्लचे कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजने मर्डर मिस्ट्रीचा खुलासा केला.
मृतदेह बाइकवरून पडल्यावर पळाले
मुल हवं म्हणून दाम्पत्य तांत्रिकाच्या बोलण्यात आले आणि त्यांनी हत्येचा प्लॅन केला. महिलेला मारून दाम्पत्याची बहीण आणि तिचा बॉयफ्रेन्ड मृतदेह तांत्रिकाकडे घेऊन जात होते. तेव्हा मृतदेह बाइकवरून खाली पडला. त्यानंतर ते घाबरले आणि मृतदेह तिथेच सोडून पळाले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधून सगळा खुलासा झाला.