धक्कादायक! तरूणासोबत किन्नराने जबरदस्ती संबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, नकार दिला तर केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:55 PM2021-10-08T14:55:17+5:302021-10-08T14:59:18+5:30

Madhya Pradesh Crime news : दिव्यांशु आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री २ वाजता बाईकने घरी परत येत होता. तेव्हाच बॉम्बे हॉस्पिटलजवळ बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांनी दिव्यांशुच्या गाडीला ओव्हरटेक केलं.

MP Crime News : Indore real state worker divyanshu was murdered by transgender | धक्कादायक! तरूणासोबत किन्नराने जबरदस्ती संबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, नकार दिला तर केली हत्या

धक्कादायक! तरूणासोबत किन्नराने जबरदस्ती संबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, नकार दिला तर केली हत्या

Next

मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) दररोज धक्कादायक गुन्ह्यांच्या घटना समोर येत असतात. अशीच एक खळबळजनक (Crime News) घटना समोर आली आहे. इंदुरमधील रिअल इस्टेट कंपनीचे सेल्स विभागाचे डायरेक्टर दिव्यांशुची बुधवारी हत्या झाली होती. कुटुंबियांनी संशय होता की, कुणीतरी ओळखीच्या व्यक्तीनेच त्यांची हत्या केली असेल. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी एका किन्नरासोबत तीन लोकांना अटक केली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किन्नराने मृत व्यक्तीवर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. पण त्याने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने किन्नराच्या साथीदाराने दिव्यांशुवर चाकूने हल्ला करत त्याचा जीव घेतला. लसूडिया पोलीस आणि विजय नगर पोलीस क्षेत्रात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. किन्नर झोयासहीत तीन आरोपींनी दिव्यांशु याची हत्या केल्याचं मान्य केल.

काय आहे प्रकरण?

दिव्यांशु आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री २ वाजता बाईकने घरी परत येत होता. तेव्हाच बॉम्बे हॉस्पिटलजवळ बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांनी दिव्यांशुच्या गाडीला ओव्हरटेक केलं. त्यांच्यासोबत एक तरूणी होती. हल्लेखोर जबरदस्ती दिव्यांशुवर त्या तरूणीला आपल्या सोबत नेण्यासाठी दबाव टाकू लागले होते. ही तरूणी म्हणजे किन्नर झोया होती. दिव्यांशुने नकार दिला तर हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार केले. ज्यात त्याचा मृत्यू झाला.
 

Web Title: MP Crime News : Indore real state worker divyanshu was murdered by transgender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.