प्रसिद्ध कंपनीतील एचआर मॅनेजरने केली आत्महत्या, तीन दिवसांपूर्वीच दिला होता राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:36 AM2021-10-06T11:36:29+5:302021-10-06T11:39:31+5:30
मध्य प्रदेशच्या इंदुरमधील नरीमन पॉइंटमध्ये राहणारी शालू निगम नावाच्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एका मोठ्या कंपनीच्या एचआर मॅनेजर पदावरील तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदुरमधील नरीमन पॉइंटमध्ये राहणारी शालू निगम नावाच्या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तरूणी मुळची सतना येथे राहणारी आहे आणि इंदुरमध्ये देव विग्रो कंपनीत एचआर पदावर काम करत होती. तीन दिवसांआधीच तिने राजीनामा दिला होता. घटनास्थळाहून एक सुसाइड नोटही मिळाली आहे. ज्यात तिने लिहिलं की, तिच्यावर कुणीही आत्महत्येचा दबाव टाकला नाही. त्यासोबतच इतरही काही गोष्टी तिने लिहिल्या आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
एचआर मॅनेजर शालू निगम मूळची सतना येथे राहणारी होती. ती तिच्या बहिणीसोबत राहून गेल्या ३ वर्षापासून एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. जेव्हा सायंकाळी लहान बहीण घरी परतली तेव्हा तिला तिचा मृतदेह लटकलेला दिसला. तिने लगेच याची सूना पोलिसांना आणि परिवाराला दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवला.
कुटुंबियांनी कंपनीतील स्टाफवर आरोप केला आहे की, शालू काही गोष्टीमुळे ऑफिसमध्ये टेंशनमध्ये होती. पोलिसांनी एक सुसाइड नोट सापडली आहे. मृत तरूणीचे मामा राकेश म्हणाले की, आम्हाला सूचना मिळाली की, भाचीने फाशी घेतली आहे. २ दिवसांआधीच तिच्यासोबत बोलणं झालं होतं. सांगत होती की, ऑफिसमध्ये टेंशन आहे.
कंपनीत काम करणारा तिचा सहकारी मानपाल सिंहने सांगितलं की, कंपनीत कोणतंही टेंशन नव्हतं. तिने तिच्या मर्जीने नोकरी सोडली होती. तिला कारण विचारलं तर तिने काही सांगितलं नाही. त्याबाबत काही माहीत नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.