मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातून पती-पत्नीच्या पवित्र आणि विश्वासाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका पतीने पत्नी विकलं. जेव्हा पत्नीने खरेदीरासोबत जाण्यास नकार दिला तेव्हा तिला पती आणि सासरच्या लोकांनी विहिरीत ढकलून दिलं. गावातील चौकीदाराने महिलेला बाहेर काढलं. नंतर महिलेचे वडील पोलीस घेऊन गावात आले. पोलिसात पतीविरोधात तक्रार देण्यात आली. पती सध्या फरार आहे.
हा सगळा प्रकार एका प्रथेच्या नावाखाली झाला. या प्रथेत तशी तर पत्नी आपल्या मर्जीने पतीला सोडते. पण या केसमध्ये प्रथेच्या आड पतीनेच पत्नीला विकलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती गोपाल गुर्जरवर कर्ज होतं. त्याने कर्ज फेडण्यासाठी पत्नीला विकण्याचा संतापजनक निर्णय घेतला. त्याने खरेदीदाराकडून आधी ५० हजार घेतले. जर पत्नी त्यांच्यासोबत गेली असती तर त्याला आणखीही पैसे मिळणार होते. (हे पण वाचा : भांडण झाल्यावर माहेरी गेली होती पत्नी, प्राद्यापक पतीने गर्लफ्रेन्डसोबत केलं दुसरं लग्न आणि मग....)
पीडित महिला लाडो बाईने पोलिसांना सांगितलं की, मंगळवारी अर्ध्या रात्री ३ वाजता काही अज्ञात लोक घरी आले. ते पतीसोबत काही बोलले. त्यानंतर पती गोपाल तिला म्हणाला की, गपचूप यांच्यासोबत जा. यावरून दोघांचं जोरात भांडण झालं आणि नंतर दोघेही झोपले.
ती म्हणाली की, बुधवारी सकाळी पतीने शेतात जाऊन काम करण्यास सांगितलं. ती शेतात गेली आणि तिला तेच तीन अज्ञात लोक आधीच तिथे आलेले दिसले. तिघांनी तिला सोबत चलण्यास सांगितलं. पण ती गेली नाही. तिथे सासू-सासरे आणि पतीही होता. तिघेही म्हणाले की त्या लोकांसोबत तुला जावच लागेल. (हे पण वाचा : मंदिराजवळ भेटायला बोलावलं, गाडीतून आले अन् अपहरण केलं; नशेचं इंजेक्शन देऊन ८ दिवस गँगरेप)
महिलेला विहिरीत फेकलं
महिलेने पोलिसांना सांगितलं की, मी नकार दिल्यावर सगळेच माझ्यावर धावून आले. तिघेही मला ओढत विहिरीजवळ घेऊन गेले आणि मला विहिरीत फेकलं. नंतर चौकीदाराने मला बाहेर काढलं. त्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा मला सर्वांनी खोलीत बंद केलं. ती म्हणाली की, तिचं लग्न बालपणीच करून देण्यात आलं होतं. घटनेची माहिती मिळताच वडील नारायण गुर्जर पोलिसांना घेऊन आले. पोलिसांना बघताच पती फरार झाला. पोलीस चौकशी करत आहेत.
काय आहे प्रथा?
भांडणाची प्रथा मध्य प्रदेशच्या राजगढ आणि गुना जिल्ह्यात आजही कायम आहे. या प्रथेत जेव्हा विवाहित महिला पतीला सोडून जाते तेव्हा पतीला मोठी रक्कम मिळते. याच प्रथेच्या आड महिलांना विकलंही जातं.