लाखो रूपये घेऊन कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्यासोबत पळून गेली, पोलिसांना सापडले ३० लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:43 PM2021-10-25T18:43:43+5:302021-10-25T18:44:38+5:30

इंदुरच्या कोट्याधीश व्यक्तीची पत्नी २१ ऑक्टोबरला तिच्यापेक्षा १३ वर्षाने लहान रिक्षावाल्यासोबत पळून गेली होती. यावेळी ती तिच्यासोबत घरातील ४७ लाख रूपये कॅश आणि काही दागिने घेऊन गेली.

MP : Indore millionaire's wife ran away with rickshawwala police found 30 lakhs | लाखो रूपये घेऊन कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्यासोबत पळून गेली, पोलिसांना सापडले ३० लाख रूपये

लाखो रूपये घेऊन कोट्याधीशाची पत्नी रिक्षावाल्यासोबत पळून गेली, पोलिसांना सापडले ३० लाख रूपये

Next

मध्य प्रदेशच्या इंदुरमधून ४७ लाख रूपये घेऊन रिक्षावाला प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेबाबत काहीच पोलिसांच्या हाती लागलं नाही. अशात पोलिसांनी आरोपी रिक्षावालाच्या एक मित्राकडून ३० लाख रूपये ताब्यात घेतले आहेत. असं सांगितलं जात आहे की, इंदुरच्या कोट्याधीश व्यक्तीची पत्नी २१ ऑक्टोबरला तिच्यापेक्षा १३ वर्षाने लहान रिक्षावाल्यासोबत पळून गेली होती. यावेळी ती तिच्यासोबत घरातील ४७ लाख रूपये कॅश आणि काही दागिने घेऊन गेली.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी व्यावसायिकाची ४५ वर्षीय पत्नी तिच्यापेक्षा १३ वर्षाने लहान ऑटोरिक्षा चालकाच्या प्रेमात पडली होती. ती त्याच्यासोबत घरातून पळून गेली आहे. सोबतच पळून जाताना त्यांनी साधारण ३० लाख रूपये कॅश रितेश ठाकूर नावाच्या तरूणाकडे दिले होते आणि बाकी १७ लाख रूपये घेऊन दोघे पळून गेले.

अशीही माहिती समोर आली आहे की, महिलेकडेच घराच्या मुख्य लॉकरची चावी राहत होती आणि तिनेच त्यातून पैसे काढले असतील.  पोलिसांनी रितेश नावाच्या तरूणाला अटक करून चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधिकारी दिनेश शर्मा म्हणाले की, एक महिला बेपत्ता झाल्याचं तक्रार आली होती. ज्यात महिलेचा शोध घेतला जात होता.

पोलीस अधिकाऱ्यांनुसार, रिक्षा चालकाचा एक साथीदार रितेशला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडून ३० लाख रूपये ताब्यात घेतले. पोलीस म्हणाले की, महिला आणि आरोपी रिक्षावाल्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रेम प्रकरणातून महिला घरातून पळून गेली. 
 

Web Title: MP : Indore millionaire's wife ran away with rickshawwala police found 30 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.