विष खाल्ल्यानंतर मेडिकल स्टोरमध्ये पोहोचलं कपल, म्हणाले - प्लीज, आमचा जीव वाचवा....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 12:46 PM2021-10-27T12:46:25+5:302021-10-27T12:46:43+5:30
उत्तर प्रदेशच्या राठ-हमीरपूरहून पळून आलेल्या एका अल्पवयीन प्रेमी जोडप्याने एमपीच्या शिवपुरीमध्ये येऊन कत्था मिलजवळ विष खाल्लं.
मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी कपलने विष खाल्लं, पण जेव्हा त्याचा प्रभाव सुरू झाला तेव्हा ते मेडिकल शॉपमध्ये गेले आणि दुकानदाराकडे त्यांना वाचवण्याची विनंती करू लागले. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीचा जीव वाचू शकला नाही.
उत्तर प्रदेशच्या राठ-हमीरपूरहून पळून आलेल्या एका अल्पवयीन प्रेमी जोडप्याने एमपीच्या शिवपुरीमध्ये येऊन कत्था मिलजवळ विष खाल्लं. हे कपल वॅग्नार कारमध्ये होतं. त्यांनी कारमध्येच विष खाल्लं. कारवर यूपी ९१ जे ८७७१ नंबर लिहिला होता.
विष खाल्ल्यानंतर जेव्हा दोघांना त्रास होऊ लागला तेव्हा तरूण कार पुन्हा शहराकडे घेऊन आला. रस्त्यात त्याने मातोश्री मेडिकल स्टोरवर जीव वाचवण्याची विनंती केली. मात्र, दुकानदाराने अल्पवयीन तरूणाला तडपताना पाहून औषध देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी लगेच १०० नंबर डायल केला.
घटनेचं गांभीर्य पाहू पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कपलला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्यांची स्थिती बघता त्यांना प्राथमिक उपचारानंतर ग्वाल्हेरला शिफ्ट करण्यात आलं. रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, कारममध्ये अल्पवयीन कपलने विष खाल्लं होतं. आधार कार्डवरून समजलं की हे अल्पवयीन कपल हमीरपूर राठचं राहणारं आहे आणि मुलगी अल्पवयीन आहे.