Shocking! मित्रासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्यावर लावले गंभीर आरोप, पोलिसही गेले चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:58 PM2021-08-13T15:58:18+5:302021-08-13T16:00:37+5:30
मुलीने आपल्याच एका मित्राच्या मदतीसाठी दुसऱ्या ओळखीच्या मुलावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर हे सत्य समोर आलं.
मध्य प्रदेशच्या इंदुर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अॅसिडच्या धमकीची केस नोंदवून खळबळ उडवून देणारी अल्पवयीन मुलगी खोटी बोलल्याचं समोर आलं. मुलीने आपल्याच एका मित्राच्या मदतीसाठी दुसऱ्या ओळखीच्या मुलावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर हे सत्य समोर आलं. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला समजावून सांगता प्रकरण संपवलं.
जुन्या इंदुरमधील पोलिसांनी सांगितलं की, १५ वर्षीय विद्यार्थिनीचे वडील नुकतेच पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यांनी तक्रार दिली होती की, अजय साहूने त्यांच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून धमकी दिली. इतकंच नाही तर आरोपीने विद्यार्थिनीवर अॅसिड फेकण्याची धमकीही दिली. तसेच आरोपीने धमकावून २५ हजार रूपयांची मागणीही केली. पोलिसांनी तक्रार घेत चौकशी सुरू केली. पोलिसांनी सांगितलं की, अजय याआधीही विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणी तुरूंगात गेला होता.
आरोपीचं सोशल मीडिया अकाउंट नाही
यानंतर पोलिसांनी अजय साहू याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. यादरम्यान पोलिसांची अडचण वाढली. कारण आरोपीने सांगितलं की, त्यांच कोणतंही सोशल मीडिया अकाउंट नाही. पोलिसांनी इन्स्टाग्राम मुख्यालयाला मेल करून मुलीकडून देण्यास आलेली माहिती मागवली. यादरम्यान पोलिसांना जो नंबर मिळाला तो मुलीच्याच नावावर होता. पोलिसांना संशय आला की, अजयने मुलीचे कागदपत्र देऊन तिच्या नावारवर सिम घेतलं असेल. पण पोलिसांचा संशय चुकीचा निघाला.
मुलीकडेच होतं सिम
पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, तो नंबर मुलीच्याच मोबाइलमध्ये होता. यानंतर पोलिसांनी मुलीची कसून चौकशी केली. तेव्हा तिने सगळं सत्य सांगितलं. तिने सांगितलं की, तिने तिच्या दुसऱ्या अल्पवयीन मित्राच्या मदतीसाठी ही खोटी कहाणी रचली. मुलीचा एक अल्पवयीन मित्र आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईची तब्येत खराब होती. त्यावेळी त्याने मुलीकडे पैशांची मागणी केली होती. मुलीने त्याला पैसे आणूनही दिले. पण ही बाब तिने घरात सांगितलं नाही. त्यामुळे तिने ही खोटी कहाणी रचली.
पोलिसांनी सांगितलं की, अजय विरोधात याआधीही या मुलीने छेडछाड केल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे तिने पुन्हा त्याच्यावरच आऱोप लावणं योग्य समजलं. मुलीनेच आरोपीच्या नावाने फेक इन्स्टाग्राम आयडी बनवलं. धमकी, पैसे आणि अॅसिड अटॅक सारखी कथा रचली.
पोलीस अधीक्षक महेशचंद जैन म्हणाले की, पोलिसात नोंदवण्यात आलेल्या केसमध्ये नवा खुलास झाला. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून अजय विरोधात गंभीर गुन्हा दाखल केला. चौकशीदरम्यान समजलं की, अजय निर्दोष आहे. सोबच मुलगीच यात संशयित आढळून आली. दोघेही अल्पवयीन आहेत त्यांना समजावून सांगून प्रकरण मिटवण्यात आलं.