पालघर - शिवसेनेचे पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी एका खाजगी व्यावसायिकाकडून 50 लाखाची रक्कम घेतली होती. ती परत केली जात नसल्याने त्यांच्याविरोधात पालघरच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता. आज न्यायालयात त्याचा निकाल लागला असून खासदार गावित यांना एक महिन्याची शिक्षा तर एक कोटी 75 लाख रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याविरोधात सेशन कोर्टात अपील दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार राजेंद्र गावित यांनी लोकमतला दिली.
खासदार गावित ह्यांनी पालघर मधील साई नगर येथील आपली जागा विकसित करण्यापोटी पालघर पूर्व येथील चिराग कीर्ती बाफना ह्यांच्याकडून एक कोटींची आगाऊ रक्कम घेतली होती.मात्र एकच जमीन दोन लोकांना देण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यावर बाफना ह्यांनी सन 2017 मध्ये पालघर च्या दिवाणी न्यायालयात (वरिष्ठ स्तर) दावा दाखल केला होता.ह्याप्रकरणी 2019 साली 2कोटी 50 लाखाची तडजोड झाली होती.
आजीसोबत प्रवचनासाठी गेलेल्या मुलीचे अपहरण, दोन अल्पवयीन मित्रांनी केला गॅंगरेप
ह्या प्रकरणी 1कोटींचा एक चेक वटल्या नंतर उर्वरित 25 लाखाचे 6 चेक मात्र बाऊन्स झाल्याने कलम 138 प्रमाणे व्यावसायिक बाफना ह्यांनी पुन्हा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पालघर कडे दावा दाखल केल्याचे फिर्यादी चे वकील ऍड.सुधीर गुप्ता ह्यांनी लोकमत ला सांगितले. अनेक वेळा ह्या प्रकरणावर सुनावणी झाल्या नंतर सोमवारी ह्या प्रकरणी अंतिम सुनावणी झाली.आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चे न्यायाधीश विक्रांत खंदारे ह्यांनी खासदार गाविताना एक वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी ७५लाखाचा दंड ठोठावल्याचा निर्णय जाहीर केला.ह्या निर्णया विरोधात आपण लवकरच सत्र न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे लोकमत ला सांगितले.