मध्य प्रदेशच्या शिवपुरी भागात गेल्या चार दिवसांपासून चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या. या घटनांमागचं गुढ उकलण्यात आता मोठं यश प्राप्त झालं आहे. वर्कशॉपमधील कामगारांनी रात्रभर जागून चोरट्यांना रंगेहात पकडलं आहे. बाइंडिंग वर्कशॉपमध्ये गेल्या चार दिवसांपासून दररोज चोरी होत होती. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. एका खासगी बस स्टँडवर उभं राहून वर्कशॉपमधील लोकांनी रात्रभर जागून चोरी करणाऱ्या एकूण चार आरोपींना पकडलं आहे.
बाइंडिंग वर्कशॉपच्या संचलकानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता चोर पुन्हा एकदा चोरी करण्यासाठी वर्कशॉपमध्ये घुसले होते. दोन मोठे पाण्याचे पंप ते चोरी करत होते. पण यावेळी चोरांना पकडण्यासाठी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनासोबत घेऊन मालकानं जबरदस्त प्लान केला होता. कर्मचारी वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. चोर वर्कशॉपमधून पाण्याचा पंप उचलून नेत असतानाच कर्मचाऱ्यांनी चारही चोरांना घेरलं आणि रंगेहात पकडलं. त्यानंतर चौघांनाही दोरखंडानं बाधलं आणि जोरदार फटकावलं. पोलिसांना फोन करुन पाचारण करण्यात आलं आणि चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
वर्कशॉपमध्ये गेल्या चार दिवसांपासून दररोज चोरीच्या घटना घडत असल्यानं दुकानाचा मालक खूप वैतागला होता. चोरांना पकडण्यासाठी त्यानं प्लानिंग केलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांनायासाठी सोबत घेतलं. चोर नेहमीप्रमाणे त्याही रात्री चोरीसाठी वर्कशॉपमध्ये शिरले. चोरांच्या हालचालीवर वर्कशॉपचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. चोरांनी पाण्याचं पंप उचलून नेण्यास सुरुवात केली आणि ठरवलेल्या ठिकाणी दडून बसलेले कर्मचारी बाहेर आले. चोरांना चारही बाजूंनी घेरुन त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि दुकान मालकानं पोलिसांना पाचारण करुन चोरांना त्यांच्या ताब्यात दिलं.