सावत्र आईनेच १० वर्षीय मुलाला जेवणात विष देऊन मारलं, डॉक्टरांना म्हणाली - साप चावला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:14 PM2021-09-29T18:14:02+5:302021-09-29T18:14:42+5:30

पुराव्यांच्या आधारावर पोलसांनी आरोपीची चौकशी केली आणि तिने गुन्हा कबूल केला.  पोलिसांनी मृत नितीनचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर जूली विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. 

MP : Step mother killed son with poison for 10 lakh and property in Gwalior | सावत्र आईनेच १० वर्षीय मुलाला जेवणात विष देऊन मारलं, डॉक्टरांना म्हणाली - साप चावला...

सावत्र आईनेच १० वर्षीय मुलाला जेवणात विष देऊन मारलं, डॉक्टरांना म्हणाली - साप चावला...

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यात १० वर्षीय मुलाला विष देऊन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यावर खुलासा केला की, मुलाची हत्या त्याच्या सावत्र आईनेच केली. पुराव्यांच्या आधारावर पोलसांनी आरोपीची चौकशी केली आणि तिने गुन्हा कबूल केला.  पोलिसांनी मृत नितीनचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर जूली विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. 

का केली सावत्र मुलाची हत्या

मीडिया रिपोर्टनुसार, राजू मिर्धाच्या १० वर्षीय मुलाचा शुक्रवारी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. मृतकाच्या वडिलांनी सांगितलं की, नितीनने रात्री जेवण केलं. तेव्हाच त्याला अस्वस्थ जाणवू लागलं होतं. तब्येत जास्त बिघडल्याने त्याला  रात्री उशीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला.

आई म्हणाली - सापाने दंश मारला...

मुलाच्या मृत्यूवेळी सावत्र आई जूली म्हणाली की, मुलाला सापाने दंश मारला. डॉक्टरला याबाबत शंका झाली आणि त्यांनी पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला. विष देण्याबाबत पोलिसांनी चौकशी केली आणि तलाशीही घेतली. चौकशीतून समोर आलं की, मृतकाची आई जूली ही त्याची सावत्र आई आहे. मृतकाचे वडील राजूची पहिल्या पत्नीचा एका अपघातात मृत्यू झाला होता.

का केलं असं?

पत्नीच्या मृत्यूनंतर पती राजूला १६ लाख रूपये मिळाले होते. या पैशांमधील त्याने मुलाच्या नावावर  १० लाख रूपये जमा केले होते. त्याने एक प्लॉटही खरेदी केला होता. तोही नितीनच्या नावावरच होता. यामुळे जूली नाराज होती. ती मुलाचा राग करू लागली होती. तिला तिच्या मुलींच्या भविष्याची चिंता होऊ लागली होती. त्यामुळे अलिकडे तिचं पतीसोबत पैशांवरून नेहमीच भांडण होत होतं.

चौकशीत मान्य केला गुन्हा

संशयाच्या आधारावर पोलिसांनी जूलीची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान जूलीने सांगितलं की, तिने प्लॉट आणि १० लाख रूपयांच्या बदल्यात नितीनच्या जेवणात विष टाकलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली.
 

Web Title: MP : Step mother killed son with poison for 10 lakh and property in Gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.